ई पीक पाहणी अंतर्गत विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न 1.ई पीक पाहणी म्हणजे काय?
उत्तर: ई-पीक पाहणी ही राज्य शासनाद्वारे सुरु करण्यात आलेली एक नवीन आणि डिजिटल पद्धत आहे ई पीक पाहणी च्या माध्यमातून शेतकरी आपल्या शेतातील पिकांची नोंदणी ई पीक पाहणी अँप च्या सहाय्याने स्वतः करू शकतात. यापूर्वी पिकांची नोंदणी तलाठी या सरकारी अधिकाऱ्याद्वारे करण्यात येत होती. मात्र, ई-पीक पाहणीच्या माध्यमातून ह्या सर्व प्रक्रिया ऑनलाइन आणि मोबाईल अँप च्या सहाय्याने पार पाडली जाते.
प्रश्न 2. ई-पीक पाहणी कशी करतात?
उत्तर: ई-पीक पाहणीसाठी टाटा ट्रस्ट मार्फत एक मोबाईल अँप बनविण्यात आलेला आहे.. या अँपमध्ये शेतकऱ्यांना आपल्या शेताचे क्षेत्र, पिकांची नावे, लागवडीचा काळ इत्यादी माहिती ऑनलाईन भरता येते. अनेकदा GPS च्या सहाय्याने शेताचे क्षेत्रफळ स्वयंचलितपणे मोजले जाते.
प्रश्न 3. ई-पीक पाहणी का महत्त्वाची आहे?
उत्तर:
कृषी आकडेवारी: ई-पीक पाहणीच्या माध्यमातून सरकारला कृषी क्षेत्राची अचूक आणि अद्ययावत माहिती मिळते.
शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण: ई-पीक पाहणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या समजून त्यांच्यासाठी उपाययोजना करणे शक्य होते.