ई पीक पाहणी | E Pik Pahani
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६. महाराष्ट्र जमीन महसूल नियमपुस्तिका (खंड-४) भाग दोन, महाराष्ट्र राज्यातील ग्राम पातळीवरील महसूली लेखांकन पध्दती, महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवहया (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम, १९७१ मधील तरतुदींनुसार राज्याच्या ग्रामीण क्षेत्रात ग्राम पातळीवर महसूली लेखे ठेवण्याकरिता विविध गाव नमुने व दुय्यम नोंदवहया विहित करण्यात आलेल्या आहेत. यामधील गाव नमुना नं ७ हा "अधिकार अभिलेख” विषयक असून गाव नमुना नं. १२ हा "पिकांची नोंदवही” ठेवण्यासंदर्भात आहे. उक्त नमूद नियमपुस्तिकेतील गा.न.नं. ७-१२ संबंधी खुलासा अधिकार अभिलेख आणि पिकांची नोंदवही या शीर्षाखाली प्रकरणांमध्ये या एकत्रित नमुन्यावरील सर्वसाधारण सूचना तसेच पीक नोंदवहीमधील नोंदी घेण्या संदर्भातील कार्यपध्दती नमूद केलेली आहे. त्यानुसार, गाव नमुना नं. १२ मधील पिकांच्या नोंदी या संबंधित तलाठी यांनी घ्यावयाच्या असून, गावभेटी नंतर, सदर नोंदी चुकीच्या आढळल्यास त्या दुरुस्त करण्याबाबतचा अधिकार मंडळ निरीक्षक किंवा त्याहून वरिष्ठ असलेल्या अधिकारी यांना आहे. उपरोक्त संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक ३० जुलै २०२१ अन्वये पीक पेरणीची माहिती भ्रमणध्वनी वरील आज्ञावली द्वारा (Mobile App) गा.न.नं. १२ मध्ये नोंदविण्याची सोय स्वतः शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्याचा "ई-पीक पाहणी” कार्यक्रम संपूर्ण राज्यात राबविण्यात आला त्या अनुषंगाने राज्य शासनाद्वारे दिशानिर्देश देण्यात आलेले आहेत.
सध्या ई पीक पाहणी प्रणालीमध्ये शेतकऱ्यांनी नोंदवलेले पीक पाहणीला तलाठी हे मान्यता देतात. त्याऐवजी शेतकऱ्यांनी नोंदवलेली पिक पाहणी ही स्वयंप्रमाणित मानण्यात येवून त्यापैकी केवळ दहा टक्के पिक पाहणीची तपासणी तलाठ्यांमार्फत करण्यात येईल.
वरील सर्व पार्श्वभूमीवर ज्याअर्थी पूर्वीच्या पिकांच्या नोंदी या संबंधित तलाठी यांनी घेण्याचे पद्धतीमध्ये बदल होऊन आता शेतकऱ्यांनी त्यांच्या स्मार्ट भ्रमणध्वनीमधील ई- पिकपाहणी आज्ञावली द्वारे पिकांची माहिती नोंदविण्यास सुरूवात झालेली आहे.
ई-पीक पाहणी: शासन निर्णयान्वये राज्यातील पिक पेरणीची माहिती भ्रमणध्वनीवरील अँप द्वारा गाव नमुना नंबर 12 मध्ये नोंदविण्यासाठी स्वतः शेतकऱ्यांनी उपलब्ध करून देण्याचा पथदर्शी कार्यक्रम राबविण्यात आला आहे व त्यासाठी कार्यपद्धती निश्चित करून देण्यात आली आहे. त्या अन्वये टाटा ट्रस्ट व महाराष्ट्र शासन यांच्यातील सामंजस्य करारान्वये टाटा ट्रस्टने ई पीक पाहणी हे मोबाईल अँप विकसित केले आहे.
मागील काही दशकात तलाठी यांचेकडील वाढलेल्या कामाचा बोजा विचारात घेता पिकांच्या नोंदी करण्यासाठी त्यांना आटोकाट परिश्रम करावे लागतात. तालाठयांच्या कामाचा बोजा कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांच्या सहभागाने मोबाईल अँप च्या आधारे शेतकऱ्यांनी स्वतः पीक पेरणीची माहिती तलाठ्याकडे ऑनलाइन पाठविण्यासाठी ई पीक पाहणी प्रकल्प राबविण्यात आला आहे.
ई-पीक पाहणी हा महाराष्ट्र सरकारचा एक उपक्रम आहे ज्याद्वारे शेतकरी स्वतःच्या मोबाइल फोनवरून त्यांच्या पिकाची नोंद करू शकतात. यामुळे पारंपारिक पद्धतीपेक्षा पिकांची नोंदणी जलद आणि अधिक कार्यक्षम बनते.
ई पीक पाहणी प्रकल्पाला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद:
- आजवर 90 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी ई पीक नोंदणी केली असून 70 लाखांहून अधिक शेतकऱ्यांची सातबारावरील ई-पीक नोंदणी पूर्ण केली गेली आहे.
- गेल्या वर्षी खरीप हंगामात 380 पिकांची तर रब्बी हंगामात 263 पिकांची आणि उन्हाळी हंगामात 183 अशा एकूण 826 पिकांची नोंद केली गेली.
- त्यानुसार गेल्या वर्षात सोयाबीन पिकाखाली 25 लाख 88 हजार 413 हेक्टर, तर हरभरा पिकाखाली 9 लाख 91 हजार 964 हेक्टर क्षेत्र आहे.
- 1 लाख 91 हजार 338 हेक्टरवर भात पीक घेतले गेले.
प्रकल्पाचे नाव | ई पीक पाहणी |
---|---|
राज्य | महाराष्ट्र |
उद्दिष्ट | पिकाचे नुकसान झाल्यास त्वरित लाभ देणे. |
लाभार्थी | राज्यातील शेतकरी |
लाभ | ऑनलाईन पिकांच्या पेरणीची नोंदणी |
नोंदणी पद्धत | ऑनलाईन नोंदणी (अँप च्या सहाय्याने) |
ई पीक पाहणी कार्यक्रमाचे उद्दिष्ट:
- क्षेत्रीय स्तरावरुन पीक पाहणी Real time crop data संकलित होण्याच्या दृष्टीने तसेच सदर data संकलित करताना पारदर्शकता आणणे.
- पीक पेरणी नोंदणी प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रीय सहभाग घेणे.
- कृषी पतपुरवठा सुलभ करणे.
- पीक विमा आणि पीक पाहणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ करणे.
- नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे शक्य व्हावे इत्यादी उद्देशाने शेतकऱ्यांनी त्यांच्या स्मार्ट भ्रमणध्वनीमध्ये ई- पिक पाहणी अँप स्थापना करून पीक पाहणी नोंदवण्याची नवीन पध्दत दिनांक १५ ऑगस्ट २०२१ पासून संपुर्ण राज्यात लागू केली आहे.
- शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई चे दावे लवकरात लवकर निकाली काढण्याच्या उद्देशाने ई पीक पाहणी कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
ई पीक पाहणी कार्यक्रमाचे वैशिष्ट्य:
- महाराष्ट्र राज्य शासनाच्या महसूल आणि कृषी विभागांनी संयुक्तरीत्या राज्यात ई पीक पाहणी कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू केली आहे.
- महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना विविध योजना तसेच पिकांच्या नुकसानीची भरपाई लवकरात लवकर पोहचविण्याचा दृष्टीने सुरु करण्यात आलेली हि एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे.
- ई पीक पाहणी कार्यक्रमाअंतर्गत राबविण्यात येणारी प्रक्रीया पारदर्शक असल्याने प्रत्येक शेतकऱ्याला यात सहभागी करून घेण्याचे प्रशासनाचे स्वप्न पूर्ण होईल.
- या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीकरिता राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुका स्तरावर समिती गठित करण्यात आली आहे.
प्रकल्प अंमलबजावणीचा कालावधी:
- सर्वसाधारणपणे प्रत्येक हंगामातील सुरुवातीची 2 महिने शेतकरी आपल्या शेतातील पिकाची पीक पाहणी मोबाईल अँप द्वारे अपलोड करतील.
- व त्यानंतरचा 1 महिना तलाठी व कृषी सहाय्यक हे 10% नमुना पडताळणी करतील
- आणि त्यानंतर तलाठी ई पीक पाहणी आज्ञावलीद्वारे पीक पाहणीलाअंतिम मान्यता देतील.
पिकांच्या समाविष्ट अवस्था:
- पीक पेरणी नंतर दोन आठवड्यात वाढलेले पीक
- पिकाची पूर्ण वाढलेली अवस्था
- कापणी (हंगाम) पूर्वीची अवस्था
ई पीक पाहणी प्रकल्पाचे राज्यभर अंमलबजावणीचे महत्वाचे टप्पे
- महसूल व कृषी यंत्रणा आणि शेतकऱ्यांसाठी जागरूकता आणि क्षमता निर्माण मोहीम चालवणे.
- ई-पीक पाहणी अंतर्गत खातेदाराची फक्त एकदाच नोंदणी करण्यात येईल.
- हंगाम निहाय पिकाची माहिती अक्षांश रेखांशासह काढलेल्या पिकाच्या फोटोसह अपलोड करण्यात येईल.
- मोबाईल अँप मधून प्राप्त झालेल्या पिकाची माहिती अचूकता पडताळून पिकाची माहिती तलाठी यांनी कायम करणे अथवा दुरुस्त करून कायम करतील.
- खातेनिहाय पिकांची माहिती संबंधित डिजिटल स्वाक्षरीत 7/12 मधील गाव नमुना नंबर 12 मध्ये उपलब्ध करून देण्यात येईल.
- शेतकरी रब्बी हंगामाची पीक पाहणी अपलोड करू शकतात.
- एका मोबाईलवरून 20 खातेदारांची नोंदणी करता येणार असल्याने एखाद्या शेतकऱ्याकडे स्वत:चा स्मार्टफोन नसल्यास उपलब्ध होणारा दुसरा स्मार्टफोन वापरता येईल.
ई पीक पाहणी शासन निर्णय 1 | Download | ई पीक पाहणी शासन निर्णय 2 | Download |
---|---|
ई पीक पाहणी शासन निर्णय 3 | Download |
ई पीक पाहणी शासन निर्णय 4 | Download |
E Pik Pahani Customer Care Number | 02025712712 |
E Pik Pahani App | Visit |
E Pik Pahani Website | Visit |
E Pik Pahani Registration Process PDF | Visit |