खरीप हंगाम 2026 ई-पीक पाहणी: संपूर्ण मार्गदर्शक लेख
महाराष्ट्र शासनामार्फत १ ऑगस्ट २०२६ पासून खरीप हंगाम २०२६ साठीची ई-पीक पाहणी प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. यावर्षी राज्यातील ई-पीक पाहणीमध्ये अत्यंत महत्त्वाचा बदल करण्यात आला असून, ही पाहणी DCS MH (Digital Crop Survey Maharashtra) या नवीन अॅप्लिकेशनच्या साहाय्याने आणि ई-पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पार पाडली जाणार आहे.
ई-पीक पाहणी प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वी सहाय्यकांना व सर्वेक्षकांना सराव व्हावा यासाठी 'DCS E-Peek Pahani Training App' उपलब्ध करून देण्यात आले आहे.
Note :
डेमो ॲप्लिकेशन (Demo Application) म्हणजे काय?
डेमो ॲप्लिकेशन (Demo Application) म्हणजेच मुख्य (Original) ॲप्लिकेशन वापरण्यापूर्वी ते कसे काम करते हे समजून घेण्यासाठी आणि त्याचा सराव करण्यासाठी तयार केलेले एक नमुना ॲप्लिकेशन.
प्रमुख उद्दिष्ट: वापरकर्त्याला ओरिजिनल ॲप्लिकेशनचे फीचर्स, इंटरफेस आणि काम करण्याची पद्धत कोणत्याही रिस्कशिवाय शिकता यावी.
फायदे:
- प्रत्यक्ष अँप्लिकेशन वर काम करताना चुका होण्याची शक्यता कमी होते. डेटा किंवा पैशांचे कोणतेही नुकसान होत नाही.
- ओरिजिनल ॲप कसे वापरावे याचे मोफत प्रशिक्षण मिळते.
अॅप डाऊनलोड आणि लॉगिन प्रक्रिया
- सर्वात प्रथम तुम्हाला Google Play Store वर जाऊन DCS Training App सर्च करून ते डाउनलोड करायचे आहे.
- Application Install केल्यानंतर ते Open करायचे आहे
- Application Open केल्यानंतर आपल्याला सर्वात पहिले लोकेशनची परमिशन मागितली जाईल लोकेशनची परमिशन द्यायची (While Using The App)
- तुम्हाला जी भाषा पाहिजे त्या भाषेची निवड करायचीय आहे.
- आता तुमच्यासमोर एक नवींन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला सर्वेक्षक म्हंणून साइन करा वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकून संकेतांक ची विनंती करा वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन ओपन ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला i have read and agree to the above notice वर क्लिक करून PROCEED बटनावर क्लिक करावे लागेल.






शेतजमीन (प्लॉट) निवड व जीपीएस लोकेशन
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला माझी कार्ये, पर्यवेक्षण टिपण्या, सर्वेक्षणासाठी उपलब्धता सेट करा, मास्टर माहिती असे पर्याय दिसतील त्यामध्ये तुम्हाला माझी कार्ये या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- माझे कार्यवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासाठी जे प्लॉट अलॉट करण्यात आलेले आहेत ते दाखवले जाणार आहेत ते प्रलंबित आहेत या सर्वेक्षण प्रलंबित वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्लॉट दाखवला जाईल त्याच्या मालकाची माहिती आपल्याला पाहायची असेल ती मालकाची माहिती सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहता येणार आहे याच्यामधील ज्या प्लॉटची ई पीक पाहणी करायची त्या प्लॉट वर तुम्हाला क्लिक करायच आहे.
- प्लॉट वर क्लिक केल्यानंतर मॅप मध्ये तो प्लॉट कुठे आहे हे आपल्याला दाखवल जाणार आहे त्या प्लॉट पासून आपल अंतर किती आहे हे आपल्याला दाखवल जाणार आहे ते अंतर आपल्याला 20 मीटर च्या आत मध्ये असणं गरजेच आहे ते आपल्याला अंतर त्या ठिकाणी दाखवल जात आहे आणि हा जर प्लॉट आपण ई पीक पाहणी करू शकत नसाल तर सर्वेक्षण करण्यात अक्षम यावर क्लिक करायचे आहे परंतु आपण आता आपण सर्वेक्षण करणार आहोत त्यामुळे आपल्याला पुढे जा वरती क्लिक करायच आहे.
- पुढे जा वरती क्लिक केल्यानंतर त्या प्लॉट चा जो मालक आहे त्याची सर्व माहिती तुम्ही पाहू शकता त्या प्लॉट मध्ये किती जमीन आहे त्याची माहिती ही सर्व माहिती आपल्याला दाखवली जाते आता तुम्ही पुढे जा वर क्लिक करा.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला जमिनीचा वापर बिगरशेती कारणांसाठी केला आहे का? यामध्ये होय किंवा नाही याची निवड करायची आहे आणि पुढे जा बटनावर क्लिक करायचे आहे. : जर तुम्ही होय ची निवड केली तर तुम्हाला खालील माहिती भरावी लागेल.
- Select NA Type : मध्ये खालील पैकी एकाची निवड करावी लागेल
- animal shelter or pashu shala
- factory or cottage industry
- house
- pond or lake
- quarry
- shop or commercial
- tubwell room
- water tank
- other na use (for those that are none of the above)
- NA चा आकार - यामध्ये तुम्हाला क्षेत्रफळ टाकायचे आहे
- छायाचित्रे घेणे - तुम्हाला जमिनीचे फोटो अपलोड करायचे आहेत
- शेरा - यामध्ये तुम्हाला शेरा टाकायचा आहे
- आणि Add NA Area वर क्लिक करायचे आहे
- जर तुम्ही नाही ची निवड केली तर एक नवीन पेज ओपन होईल.
- पडीक नापीक जमीन की मोकळी जमीन मध्ये होय ची निवड केल्यास खालील माहिती भरावी लागेल.
-
- Select Fallow Type - मध्ये खालील पर्यायाची निवड करावी लागेल.
- Fallow
- Forest Land
- Vacant
- Waste
- क्षेत्रफळ टाकावे लागेल
- शेरा मध्ये काही टाकू शकता
- आणि जर तुम्ही नाही ची निवड केली तर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला खालील पर्याय निवडावे लागतील.
- Is there any area which is already harvested? यामध्ये तुम्हाला होय किंवा नाही या पैकी एक पर्यंत निवडावा लागेल.
- जर तुम्ही होय पर्यंत निवडला तर तुम्हाला दिलेल्या पर्याय मधून पिकाचे नाव निवडावे लागेल.
- spinch beed
- Bakla
- Coleus
- Cotton
- Crossandra
- Mango
- Ginger
- Orange
- Vetiver
- Grapes
- क्षेत्रफळ टाकावे लागेल.
- आणि जर तुम्ही नाही पर्याय वर क्लिक केलात तर तुम्हाला शेरा मध्ये खरीप टाकावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला Perennials / Biennial / Seasonal मध्ये is there any perennial crops? मध्ये होय किंवा नाही ची निवड करावी लागेल.
- जर तुम्ही होय निवडलात तर तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल (पिकाचे नाव, पिकाचे वाण, क्षेत्रफळ, पीक स्थिती, सिंचन स्रोत, सिंचन प्रकार, Crop Pattern छायाचित्र)
- सर्व माहिती भरून झाल्यावर पुढे जा वर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुम्ही भरलेली सर्व माहिती दिसेल त्यामध्ये खाली जतन करा या बटनावर क्लिक करायचे आहे.
- आता तुम्हाला तुमच्या अँप्लिकेशन च्या होम पेज वर यायचे आहे तेथे तुम्हाला वरती upload pending दिसेल त्याच्यावर क्लिक करायचे आहे किंवा तुम्ही माझी कार्ये मध्ये सुद्धा अपलोड प्रलंबित पर्यायावर क्लिक करून सुद्धा पाहू शकता
- अपलोड प्रलंबित वर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर खालील प्रकारे पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला Select मध्ये टिक करायचे आहे आणि अपलोड करा वर क्लिक करायचे आहे.
















आता तुमचे किती प्लॉट राहिले ते आपल्याला या ठिकाणी दाखवल जाईल अशाच प्रकारे आपल्याला प्रत्येक प्लॉट या ठिकाणी करायचा आहे आणि हा प्लॉट पाहणी झाल्यानंतर डाटा अपलोड झाल्यानंतर पुढे ती सत्यापित केली जाईल त्याच व्हेरिफिकेशन केल जाईल अशा प्रकारची याच्या अंतर्गत प्रक्रिया असणार आहे आणि अशा प्रकारच्या आपण ट्रेनिंग याच्यामध्ये वारंवार वेगवेगळ्या प्लॉटच्या करू शकता या ट्रेनिंग झाल्यानंतर पुढे 1 ऑगस्ट 2026 नंतर शासनाच्या माध्यमातून सूचना दिल्यानंतर याच्या अंतर्गत शेतकऱ्यांची ई पीक पाहणी करण्यासाठी सुरुवात केली जाणार आहे तुम्हाला याच्या अंतर्गत टास्क दिले जातील जेवढे टास्क तुम्हाला मिळतील तेवढे प्लॉट तुम्हाला त्या ठिकाणी करता येणार आहे तुमचे टास्क पूर्ण झाल्यानंतर काही उपलब्ध टास्क असतील ते सुद्धा दिले जातील आणि प्रति प्लॉट साठी 12 रुपयाच मानधन दिलं जाणार आहे तर अशा प्रकारची इ पीक पाहणी आता सूचना दिल्यानंतर एक ऑगस्ट 2026 नंतर राज्यामध्ये सुरू केली जाणार आहे.