ई पीक पाहणी अँप च्या सहाय्याने कायम पड / चालू पड जमिनीची माहिती भरण्याची पद्धत


महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ई-पीक पाहणी अ‍ॅप च्या मदतीने शेतकरी त्यांच्या जमिनीची नोंदणी करू शकतात. यामध्ये कायम पड आणि चालू पड जमिनीचीही माहिती भरता येते.


कायम पड आणि चालू पड जमीन म्हणजे काय?


ई-पीक पाहणी कार्यक्रम अंतर्गत कायम पड / चालू पड जमीन नोंदणीचे फायदे:

महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ई-पीक पाहणी कार्यक्रम अंतर्गत कायम पड आणि चालू पड जमिनीची नोंदणी केल्याने शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळू शकतात.
  1. शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास मदत:
    • शासकीय योजनांसाठी पात्रता मिळते: माती परीक्षण, सिंचन योजना, भूजल संवर्धन योजना यांसाठी अर्ज करता येतो.
    • अनुदान आणि योजनांचा लाभ मिळण्यास मदत: भविष्यात शेतीसाठी मदत किंवा सुधारणा योजना लागू केल्या तर त्याचा फायदा मिळू शकतो.
    • सिंचन योजना आणि जल व्यवस्थापनासाठी पात्रता मिळण्यास मदत: जलसंधारण, विहीर अनुदान, ठिबक सिंचन योजना आणि पाण्याच्या सुविधा मिळण्यासाठी मदत.
    • माती परीक्षण आणि सुधारणा योजना: नोंदणीकृत पड जमिनींसाठी माती परीक्षण व त्यासाठी लागणाऱ्या सुधारणा करण्यासाठी शासकीय मदत मिळू शकते.
  2. शेतीसाठी भविष्यातील योजना आखणे सोपे होते:
    • नवीन शेतीसाठी आवश्यक मदत मिळते: जर जमीन शेतीसाठी पुन्हा वापरण्याचा विचार असेल तर त्या भागातील कृषी तज्ञ किंवा सरकारी मदत मिळण्यास मदत होते.
    • सुधारित लागवडीसाठी मदत: योग्य नियोजनाद्वारे पड जमिनींवर नवीन पिके घेण्यासाठी मार्गदर्शन मिळू शकते.
  3. सातबारा उताऱ्यावर योग्य नोंद मिळते:
    • शेतजमिनीची अद्ययावत माहिती राखली जाते: भविष्यात सातबारा उताऱ्यावर अचूक नोंद होते.
    • भविष्यात जमीन विक्री करताना किंवा वारसा तपासणे सोयीस्कर ठरते.
  4. जमिनीचा योग्य वापर आणि सुधारणा शक्य होते:
    • जमीन नापिक असल्याच्या कारणांचा अभ्यास करता येतो: जमीन पडिक राहण्याची कारणे (उदा. पाणीटंचाई, खडकाळ जमीन, आर्थिक परिस्थिती) स्पष्ट करता येतात.
    • जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी सरकारी योजना लागू करता येतात.
  5. पारदर्शकता आणि सोपी प्रक्रिया:
    • ऑनलाइन पद्धतीमुळे सहज आणि जलद नोंदणी करता येते.
    • तलाठ्याच्या चकरा न मारता थेट मोबाइल अ‍ॅपद्वारे माहिती नोंदवता येते.
    • भ्रष्टाचार आणि चुकीच्या नोंदी टाळता येतात.

शेतकऱ्याला सर्वात प्रथम Google Play Store वर जावे लागेल व E-Pik Pahani ई-पीक पाहणी (DCS) अँप Install करायचा आहे.

image

अँप Install झाल्यावर तो Open करायचा आहे.

image

आता तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील Photo आणि Media च्या Access साठी Permission मागेल त्यासाठी Allow वर क्लिक करायचे आहे.

image

आता तुम्हाला तुमच्या Mobile च्या Location साठी Permission द्यावे लागेल त्यासाठी While Using This App व क्लिक करावे लागेल.

image

आत तुम्हाला फोटो आणि विडिओ साठी Permission द्यावे लागेल त्यासाठी While Using This App व क्लिक करावे लागेल.

image

आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा विभाग निवडायचा आहे.

image
image

तुमच्या विभागाची निवड केल्यावर Right Arrow वर क्लिक करायचे आहे.

image

आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला लॉगिन पद्धत निवडायची आहेत त्यासाठी तुम्हाला शेतकरी म्हणून लॉगिन करा वर क्लिक करायचे आहे.

image

आता तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक टाकून पुढे जा बटनावर क्लिक करायचे आहे.

image

आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका व गावाची निवड करायची आहे व Right Arrow वर क्लिक करायचे आहे.

image

आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचे खाते शोधायचे आहे तुम्ही तुमचे पहिले नाव, मधले नाव, आडनाव, खाते क्रमांक, गट क्रमांक टाकून खाते शोधू शकता. तुम्ही निवडलेल्या पर्यायानुसार माहिती भरा आणि शोध बटनावर क्लिक करा.

image

आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला खातेदार निवड मध्ये तुमच्या खातेदाराची निवड करायची आहे आणि Right Arrow वर क्लिक करायचे आहे.

image

आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला खातेदाराचे नाव व खाते क्रमांक दिसेल आता तुम्हाला तुमच्या खाते क्रमांकाची निवड करायची आहे आणि Right Arrow वर क्लिक करायचे आहे.

image

आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक दिसेल तुमचा मोबाईल क्रमांक योग्य असल्याची खात्री करून घ्या व तो योग्य असल्यास पुढे वर क्लिक करा (जर तुमचा मोबाईल क्रमांक चुकीचा असेल किंवा तो बदलायचा असेल तर मोबाईल क्रमांक बदला वर क्लिक करून तो बदलून घ्या.)

image

आता तुम्हाला एक मेसेज दिसेल तुमची नोंदणी आधीच झालेली आहे. तुम्हाला पुढे जायचे आहे का? तुम्हाला होय वर क्लिक करायचे आहे.

image

आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला खातेदाराचे नाव निवडायचे आहे आणि तुमचा सांकेतांक टाकायचा आहे. (जर तुम्ही तुमचा सांकेतांक नंबर विसरला असाल तर सांकेतांक विसरलास? वर क्लिक करा तुम्हाला तुमचा सांकेतांक दिसेल.)

image

आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला कायम पड / चालू पड निवडा वर क्लिक करावे लागेल.

image

आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली पड / चालू पड सर्व माहिती भरावयाची आहे आणि Right Arrow वर क्लिक करायचे आहे.

image
image

अशा प्रकारे तुमची ई पीक पाहणी अंतर्गत पड / चालू पड ची नोंद केली जाईल.


निष्कर्ष:

ई-पीक पाहणी अंतर्गत कायम पड आणि चालू पड जमिनीची नोंदणी केल्याने शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ, भविष्यातील शेतीसाठी मदत, आणि अचूक डिजिटल नोंदणीचा फायदा होतो. ही प्रक्रिया शेती व्यवस्थापन अधिक सुलभ आणि पारदर्शक बनवते.