गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना - Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana


राज्यातील शेतकरी तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्यांना शेती व्यवसाय करतांना विविध अपघातांमुळे मृत्यू ओढवतो किंवा काही वेळा त्यांना अपघातांमुळे अपंगत्व येते. अशावेळी त्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्यात गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना सुरु करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.


यापूर्वी राबविण्यात आलेली “गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना” ही केवळ ७/१२ वर नाव असलेल्या खातेदार शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीसाठी, अशा एकूण 2 व्यक्तींसाठी लागू होती. राज्यात शेती व्यवसायामध्ये प्रत्यक्ष राबणाऱ्या भूमिहीन शेतमजुरांचा वाटा मोठा असून कामाच्या ठिकाणी त्यांनाही अपघाताचा धोका असतो. भूमिहीन शेतमजुराचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास त्याच्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढविते. या बाबींचा विचार करता या योजनेचे संरक्षण भूमिहीन शेतमजुरांनाही देणे आवश्यक आहे. याखेरीज महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, 2026 अंतर्गत “महिला शेतकरी” म्हणून प्रमाणपत्र मिळालेल्या महिला शेतकऱ्यांचा देखील या योजनेच्या लाभकक्षेत अंतर्भाव करणे आवश्यक आहे.


gopinath munde shetkari apaghat vima yojana

याशिवाय पूर्वीची योजना महितीधारक खातेदार शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील महितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणत्याही एका सदस्यासाठी (आई/वडील, शेतकऱ्याची पत्नी/पती, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी 10 ते 75 वयोगटातील कोणतीही एक व्यक्ती) अशा एकूण दोन व्यक्तींसाठी राबविण्यात येत होती.


शेतकऱ्यासोबत त्यांच्या कुटुंबातील सदस्यही शेतीमध्ये काम करीत असतात. त्यामुळे महितीधारक खातेदार शेतकऱ्यासह त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य त्याचप्रमाणे भूमिहीन शेतमजूर व त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य तसेच, महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, 2026 अंतर्गत “महिला शेतकरी” प्रमाणपत्र प्राप्त सर्व महिला शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्र ठरविण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती.


या पार्श्वभूमीवर, गेल्या तीन वर्षात राबविण्यात आलेल्या, “गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेमध्ये” सुधारणा करुन, “गोपीनाथ मुंडे शेतकरी/भूमिहीन शेतमजूर/महिला शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना” दि. 1 एप्रिल, 2026 ते दि. 31 मार्च, 2031 या कालावधीत नवीन स्वरूपात राबविण्यास मान्यता देण्याबाबत शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे.


गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना शासन निर्णय


शेती व्यवसाय करतांना होणाऱ्या विविध अपघातांमुळे शेतकरी/भूमिहीन शेतमजूर/महिला शेतकरी यांचा मृत्यू ओढवतो किंवा काहीवेळा त्यांना अपघातांमुळे अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे, त्याचा मृत्यू झाल्यास अथवा त्यास कायमचे अपंगत्व आल्यास, कुटुंबाच्या उपजीविकेच्या साधनावर विपरीत परिणाम होऊन संपूर्ण कुटुंब आर्थिक विवंचनेत सापडते. अशा अपघातग्रस्त शेतकरी/ भूमिहीन शेतमजूर / महिला शेतकरी यांना, सानुग्रह अनुदान देण्याच्या दृष्टिकोनातून राज्यातील सर्व महितीधारक खातेदार शेतकरी/भूमिहीन शेतमजूर/महिला शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबातील आई-वडील, पती/पत्नी, मुलगा, अविवाहित मुलगी, घटस्फोटीत मुलगी व विधवा मुलगी अशा 10 ते 75 वर्ष वयोगटातील सर्व सदस्यांना या योजनेत समाविष्ट करण्यात येत असून, त्यांच्यासाठी "गोपीनाथ मुंडे शेतकरी/भूमिहीन शेतमजूर/महिला शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना” दि. 1 एप्रिल, 2026 ते दि. 31 मार्च, 2031 या 5 वर्षाच्या कालावधीत राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे.


गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचे लाभार्थी


(अ) गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना अंतर्गत राज्यातील महितीधारक खातेदार शेतकरी/भूमिहीन शेतमजूर/महिला शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील आई-वडील, पती/पत्नी, मुलगा, अविवाहित मुलगी, घटस्फोटीत मुलगी, विधवा मुलगी यापैकी कोणत्याही व्यक्तीचा अपघात होऊन अपंगत्व आल्यास किंवा त्यांचा मृत्यू झाल्यास, संबंधित शेतकरी/ भूमिहीन शेतमजूर / महिला शेतकरी किंवा त्यांचे कायदेशीर वारसदार सानुग्रह अनुदान मिळण्यास पात्र असतील.


(आ) योजनेंतर्गत कायदेशीर वारसदारांची निवड अनुक्रमे पुढीलप्रमाणे करण्यात येईल.



टीप: कायदेशीर वारसदार म्हणजे अशी व्यक्ती, जी लागू असलेल्या वारसा हक्क कायद्यानुसार, मृत व्यक्तीच्या मालमत्ता, हक्क आणि लाभांचा वारसा मिळण्यास पात्र असते; यामध्ये संबंधित कायदे किंवा योजनेच्या तरतुदींना अधीन राहून, मृत व्यक्तीच्या मृत्यूमुळे देय असलेल्या कोणत्याही भरपाईचा/नुकसान भरपाईचाही समावेश होतो.


योजनेंतर्गत सानुग्रह अनुदानाची अनुज्ञेय मर्यादा


अ.क्र. अपघाताची बाब आर्थिक सहाय्य
1 अपघाती मृत्यू रु. 2,00,000/-
2 अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी होणे रु. 2,00,000/-
3 अपघातामुळे एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी होणे रु. 2,00,000/-
4 अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी होणे रु. 1,00,000/-

सदर योजनेंतर्गत लाभास पात्र असणाऱ्या शेतकरी / भूमिहीन शेतमजूर / महिला शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने अथवा वारसदाराने शासनाच्या अन्य विभागांकडून अपघातग्रस्तांसाठी कार्यान्वित असलेल्या योजनेचा लाभ घेतला असल्यास, सदर लाभार्थी गोपीनाथ मुंडे शेतकरी/भूमिहीन शेतमजूर/महिला शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत लाभास पात्र ठरणार नाहीत. उदा. ऊसतोड कामगारांकरिता राबविण्यात येत असलेल्या योजनेचा लाभ घेतलेल्या व्यक्ती.


योजनेचा लाभ देण्यासाठी अनुज्ञेय अपघातांचे स्वरूप


योजनेंतर्गत सानुग्रह अनुदान मिळण्यास पात्र ठरण्यासाठी खालील अपघात ग्राह्य धरण्यात येतील


  1. रस्ता/रेल्वे अपघात
  2. पाण्यात बुडून मृत्यू
  3. जंतूनाशके हाताळतांना अथवा अन्य कारणांमुळे विषबाधा
  4. वीजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात,
  5. वीज पडून मृत्यू
  6. खून
  7. उंचावरून पडून मृत्यू
  8. सर्पदंश व विंचूदंश
  9. नक्षलवाद्यांकडून झालेली हत्या
  10. जनावरांच्या हल्ल्यामुळे जखमी / मृत्यू
  11. बाळंतपणातील मृत्यू
  12. दंगलीतील मृत्यू/अपंगत्व
  13. आकस्मिक अपघातामुळे झालेला अंतर्गत रक्तस्त्राव
  14. उष्माघात

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ अनुज्ञेय नसलेल्या अपघातांचे स्वरूप


  1. नैसर्गिक मृत्यू
  2. आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या / जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करून घेणे
  3. युद्ध
  4. सैन्यातील नोकरी
  5. जवळच्या लाभधारक (पती/पती/१८ वर्षाखालील मुलगा/मुलगी, अविवाहित मुलगा/मुलगी व आई/वडील, इत्यादी) यांचेकडून खून
  6. गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात
  7. वयोगट १०-१८ वर्षे दरम्यान वाहन चालवत असताना झालेला अपघात
  8. अंमली पदार्थाच्या अमलाखाली असताना झालेला अपघात
  9. मोटार शर्यतीतील अपघात

योजनेचा लाभ मिळण्यासाठी सादर करावयाच्या प्रमाणपत्रे


(अ) वहितीधारक शेतकरी

  1. ७/१२ उतारा/अॅग्रीस्टॅक अंतर्गत प्राप्त शेतकरी ओळखपत्र
  2. मृत्यूचा दाखला
  3. संबंधित तलाठ्याकडील "गाव नमुना ६ क" नुसार शेतकरी यांचे वारस म्हणून मंजूर झालेली वारसाची नोंद
  4. वहितीधारक शेतकरी यांच्या वयाच्या पडताळणीकरिता, शाळा सोडल्याचा दाखला / आधारकार्ड / निवडणूक ओळखपत्र, ज्या कागदपत्राआधारे ओळख/वयाची खात्री होईल असे कोणतेही कागदपत्रे

भूमिहीन शेतमजूर

  1. आधार कार्ड
  2. रहिवाशी दाखला
  3. एका वर्षांच्या आत, असंघटित कामगार पोर्टल (e-Shram) वरील भूमिहीन शेतमजूर म्हणून नोंदणी आवश्यक
  4. मृत्यूचा दाखला

(इ) महिला शेतकरी

  1. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ अंतर्गत "महिला शेतकरी" म्हणून प्राप्त प्रमाणपत्र
  2. मृत्यूचा दाखला
  3. आधार कार्ड
  4. रहिवाशी दाखला.

अपघाताच्या स्वरूपानुसार सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी सादर करावयाच्या कागदपत्रे


अ.क्र. अपघाताचे स्वरूप बंधनकारक कागदपत्रे
1 रस्ता/रेल्वे अपघात इन्क्वेस्ट पंचनामा, शरीर विच्छेदन अहवाल, वाहन चालवताना अपघात झाल्यास, त्याबाबत मोटार वाहन परवाना (केंद्रीय मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ३ पोट कलम १ नुसार बंधनकारक आहे.)
2 पाण्यात बुडून मृत्यू इन्क्वेस्ट पंचनामा, शरीर विच्छेदन अहवाल, बुडून बेपत्ता झाल्यास, फक्त प्रथम माहिती अहवाल व क्षतीपूर्ती बंधपत्र आवश्यक
3 जंतूनाशके अथवा अन्य कारणांमुळे विषबाधा इन्क्वेस्ट पंचनामा, शरीर विच्छेदन अहवाल व रासायनिक विश्लेषण अहवाल (व्हिसेरा अहवाल).
4 वीजेचा धक्का अपघात इन्क्वेस्ट पंचनामा व शरीर विच्छेदन अहवाल
5 वीज पडून मृत्यू इन्क्वेस्ट पंचनामा व शरीर विच्छेदन अहवाल
6 खून इन्क्वेस्ट पंचनामा, शरीर विच्छेदन अहवाल, रासायनिक विश्लेषण अहवाल (व्हिसेरा अहवाल) व दोषारोप पत्र
7 उंचावरून पडून झालेला मृत्यू इन्क्वेस्ट पंचनामा, शरीर विच्छेदन अहवाल व पोलीस तपासणी अंतिम अहवाल
8 सर्पदंश/ विंचूदंश इन्क्वेस्ट पंचनामा, शरीर विच्छेदन अहवाल, वैद्यकीय उपचारापूर्वीच मृत्यू झाल्यास, शरीर विच्छेदन अहवालातून सूट देण्यात येईल. तथापि, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, शासकीय आरोग्य केंद्र अधिकाऱ्यांकडून प्रतिस्वाक्षरीत असणे आवश्यक
9 नक्षलवाद्याकडून हत्या इन्क्वेस्ट पंचनामा, शरीर विच्छेदन अहवाल व नक्षलवादी हत्येसंदर्भातील कार्यालयीन कागदपत्रे
10 अ. जनावरांच्या चाव्यामुळे रेबीज होऊन मृत्यू

ब. जखमी होऊन मृत्यू

क. जनावरांच्या हल्ल्यात मृत्यू होऊन शव न मिळणे
अ: वैद्यकीय औषधोपचाराची कागदपत्रे

ब. क: इन्क्वेस्ट पंचनामा, शरीर विच्छेदन अहवाल व क्षतीपूर्ती बंधपत्र
11 बाळंतपातील मृत्यू बाळंतपात मृत्यू झाला असल्याबाबत, शासकीय आरोग्य केंद्र अधिकाऱ्यांकडून प्रतिस्वाक्षरीत केलेले वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र
12 दंगलीतील मृत्यू/अपंगत्व इन्क्वेस्ट पंचनामा, शरीर विच्छेदन अहवाल व दंगलीबाबतची कार्यालयीन कागदपत्रे.
13 आकस्मिक अपघातामुळे झालेला अंतर्गत रक्तस्त्राव इन्क्वेस्ट पंचनामा (शरीर विच्छेदन अहवाल आवश्यकतेनुसार) आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने विहित केलेल्या निकषांनुसार अंतर्गत रक्तस्त्रावाच्या बाबतीत, जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिलेले प्रमाणपत्र
14 उष्माघात शरीर विच्छेदन अहवाल आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने विहित केलेल्या निकषांनुसार उष्माघाताच्या बाबतीत, जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिलेले प्रमाणपत्र
15 अपंगत्वाच्या लाभाच्या पुराव्यासाठी सादर करावयाच्या कागदपत्रे 1. अपंगत्व अथवा अवयव निकामी झाले असल्याचे डॉक्टरांचे अंतिम प्रमाणपत्र किंवा दवाखान्याच्या नोंदी.

2. प्राथमिक आरोग्य केंद्र/उपकेंद्र/ जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रतिस्वाक्षरीसह कायम अपंगत्वाचे प्रमाणपत्र

टीप:
1. वरील कागदपत्रे मूळ किंवा राजपत्रित अधिकारी यांनी साक्षांकित केलेली ग्राह्य धरण्यात येतील.
2. मृत्यू कारणांची नोंद सक्षम प्राधिकाऱ्याने स्पष्ट केली असल्यास, रासायनिक विश्लेषण अहवाल (व्हिसेरा अहवाल) या कागदपत्र्याची आवश्यकता राहणार नाही.


गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना अंतर्गत ऑनलाईन दावा अर्ज करण्याची पद्धत


पहिला टप्पा



दुसरा टप्पा



गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे



गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती



महत्वाची सूचना


पोर्टल वापरताना काही अडचणी येत असल्यास, कृपया आपल्या ब्राऊझरचा ब्राऊझिंग इतिहास, कॅशे आणि कुकीज साफ करून पुन्हा प्रयत्न करा. असे केल्याने पोर्टलवरील तांत्रिक अडचणी दूर होण्यास मदत होऊ शकते.\


ब्राऊझिंग इतिहास, कॅशे आणि कुकीज साफ करण्याची पद्धत (Google Chrome):


गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना gr येथे क्लिक करा