कोतवाल भरती 2026 - Kotwal Bharti 2026
30 नोव्हेंबर 2026 पूर्वी कोतवाल सेवकांची भरती पूर्ण करावी अशा प्रकारचा शासन निर्णय काढण्यात आला आहे आणि या अनुषंगाने जी काही रिक्त पदे आहेत ती जाहीर करण्यात आली आहेत. तसेच महसूल सेवकाला मासिक १५०००/- रुपये देण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आलेले आहे. सदर रिक्त पदांची भरती हि ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०२६ महिन्यामध्ये केली जाणार आहे.

कोतवाल भरती पदभरती कशी होणार आहे? कोतवाल भरती पदासाठी कोण पात्र असणार आहे? सदर भरतीमध्ये कोणाला प्राधान्य दिलं जाणार आहे? तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा भरल्या जाणार आहेत? अर्ज करताना अटी व शर्ती तसेच पात्रतेचे निकष काय असणार आहेत? महसूल सेवकाला किती मानधन दिले जाणार आहे या सर्वांची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
कोतवाल भरती रिक्त पदे

| जिल्हा | मंजूर पदे | भरलेली पदे | रिक्त पदे |
|---|---|---|---|
| छत्रपती संभाजीनगर | ५०० | २९७ | २०३ |
| जालना | २९९ | २४४ | ४९ |
| परभणी | ३१३ | २४९ | ६४ |
| हिंगोली | ४०७ | ३२३ | ८४ |
| नांदेड | ५४७ | ३०९ | २३८ |
| बीड | ३१९ | ३०० | १९ |
| लातूर | ३१७ | २५५ | ६२ |
| धाराशिव | २५१ | २१६ | ३५ |
| एकूण | २९५३ | २१९३ | ७६० |
| नागपूर | ३२५ | ३१० | १५ |
| वर्धा | २७९ | २३३ | ४६ |
| भंडारा | १९७ | १३९ | ५८ |
| गोंदिया | १९६ | १५७ | ३९ |
| चंद्रपूर | २७८ | २११ | ६७ |
| गडचिरोली | ६८८ | ६१८ | ७० |
| एकूण | १९६३ | १६६८ | २९५ |
| अमरावती | ४८३ | ४१५ | ६८ |
| अकोला | ३९० | २३० | १६० |
| वाशिम | २८० | २३९ | ४१ |
| बुलढाणा | ४८२ | ४४३ | ३९ |
| यवतमाळ | ६२८ | ५२० | १०८ |
| एकूण | २२६३ | १८४७ | ४१६ |
| पुणे | ४८८ | ३४३ | १४५ |
| सातारा | ४५६ | ४४५ | ११ |
| सांगली | ३४८ | २८७ | ६१ |
| सोलापूर | ५२५ | ४२५ | १०० |
| कोल्हापूर | ४६४ | ३५३ | १११ |
| एकूण | २२८१ | १८५३ | ४२८ |
| नाशिक | ४३२ | ३८३ | ४९ |
| धुळे | २२५ | १७८ | ४७ |
| नंदुरबार | २२२ | १७७ | ४५ |
| जळगाव | ४५४ | ४०७ | ४७ |
| अहिल्यानगर | ५८३ | ४८३ | १०० |
| एकूण | १९१६ | १६२८ | २८८ |
| मुंबई शहर | ० | ० | ० |
| मुंबई उपनगर | ४१ | २८ | १३ |
| ठाणे | १६५ | ७७ | १०८ |
| पालघर | १८६ | ५५ | १३१ |
| रायगड | ३४९ | २३२ | ११७ |
| रत्नागिरी | ३४८ | ३३० | १८ |
| सिंधुदुर्ग | २३६ | १९४ | ४२ |
| एकूण | १३२५ | ९१६ | ४०९ |
एकूण २९९२ जागांसाठी महसूल सेवक पद भरती केली जाणार आहे ज्याच्यासाठी आता प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून या पद भरतीसाठीच्या स्वतंत्र जाहिराती काढल्या जातील आणि अर्ज मागवले जातील.
कोतवाल भरतीचा कालबद्ध कार्यक्रम
| बाब | कालावधी (दिनांक) | वेळ | ठिकाण |
|---|---|---|---|
| मागासवर्ग कक्ष विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या कडून बिंदुनामावली नोंदवही मंजुर करून घेणे | दि. २४/०८/२०२६ ते दि. ०९/०९/२०२६ | कार्यालयीन वेळेत | मागासवर्ग कक्ष, विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद. |
| कोतवाल भरतीकामी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत करणे | दि. १०/०९/२०२६ | कार्यालयीन वेळेत | संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालय/ तहसील कार्यालय. |
| कोतवाल भरती प्रक्रियेसाठी जाहीरनामा/जाहिरात प्रसिद्ध करणे | दि. १५/०९/२०२६ | कार्यालयीन वेळेत | संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालय/ तहसील कार्यालय तसेच सर्व मंडळ अधिकारी कार्यालय, तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, वृत्तपत्रात प्रसिद्ध करणे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत http://www.jalna.nic.inया संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे. |
| अर्ज दाखल करणे | दि. १६/०९/२०२६ ते दि. २९/०९/२०२६ (सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून) | ऑनलाईन प्रणालीद्वारे | संबंधित तहसील कार्यालय यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज भरणेकामी सुविधा उपलब्ध करून देणेबाबत कार्यवाही करणे. |
| लेखी परीक्षेसाठी पात्र/अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे | दि. ३०/०९/२०२६ | कार्यालयीन वेळेत | १. संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालय २. संबंधित तहसील कार्यालय ३. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. |
| ज्यांना प्रवेशपत्र पोष्टाने प्राप्त झाले नाहीत अशा उमेदवारांना तहसील कार्यालयातून प्रवेशपत्र देणे | दि. ०१/१०/२०२६ ते दि. ०३/१०/२०२६ | कार्यालयीन वेळेत | संबंधित तहसील कार्यालय |
| लेख परीक्षा | दि. ०४/१०/२०२६ | सकाळी ११ ते १२.३० | प्रवेश पत्राद्वारे पोष्टाने कळविण्यात येईल. |
मासिक वेतन
१५०००/- रुपये
प्राधान्यक्रम
पूर्वीचे जे कोतवाल असतील (जुने महसूल सेवक) त्यांच्या पाल्ल्यांना याच्यामध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे.
शैक्षणिक अर्हता
कमीत कमी इयत्ता ४ थी उत्तीर्ण
वयाची अट
अर्जदाराचे वय १८ ते ४० दरम्यान असावे. (मागास्वर्गीय / आरक्षित घटकासाठी वयामध्ये सूट शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत ५ वर्षांपर्यंतची सूट लागू असेल.)
कोतवाल सेवकाची (महसूल सेवक) कामे
- गावातील महसूल वसुली: शेतसारा, पाणीपट्टी, घरपट्टी आणि इतर शासकीय करांच्या वसुलीत तलाठ्याला मदत करणे.
- शासकीय कागदपत्रे व नोटिसा: गावातील नागरिकांना बैठकीच्या सूचना देणे, चावडीवर किंवा ग्रामपंचायतीत सूचना पोहोचवणे. तसेच महाराष्ट्र शासनाद्वारे रावबिण्यात येणाऱ्या योजनांची माहिती गावकर्यांपर्यंत पोहोचविणे व त्यांना योजनेची संपूर्ण माहिती सांगणे.
- दप्तराची ने-आण: तलाठी कार्यालयातील महत्त्वाचे कागदपत्रे, दप्तर, अहवाल हे तहसील कार्यालय किंवा मंडळ अधिकारी कार्यालयात सुरक्षितपणे पोहोचवणे.
- पंचनामे व आपत्ती व्यवस्थापन: अतिवृष्टी, दुष्काळ, अपघात किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी पिकांचे किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्यास घटनास्थळी उपस्थित राहून तलाठ्यांना पंचनाम्यासाठी मदत करणे.
- जन्म-मृत्यू व गावात सुव्यवस्था राखणे: गावातील जन्म-मृत्यूच्या नोंदी ठेवायला मदत करणे आणि गावातील कायदा व सुव्यवस्थेबाबत वरिष्ठांना माहिती देणे. तसेच संसर्गजन्य आजार किंवा गुरांच्या साथीच्या रोगांची प्राथमिक माहिती वरिष्ठांना देणे.
- पिक पाहणी: तलाठ्यासोबत गावात जाऊन पिकांची नोंद (पाहणी) करताना मदत करणे.
- अतिक्रमण माहिती: सरकारी किंवा गायरान जमिनीवरील अतिक्रमांची माहिती तलाठी किंवा मंडळाधिकाऱ्यांना देणे.
- तलाठी कार्यालयाची स्वच्छता राखणे आणि सुरक्षा पाहणे.
- तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी गावात दौऱ्यावर आल्यास त्यांना आवश्यक सहकार्य करणे.
- स्थानिक निवडणुकीच्या काळात मतदानाचा प्रचार, मतदान केंद्र व्यवस्थापन व इतर निवडणूकविषयक कामांत मदत करणे.
परीक्षा
- कोतवाल सेवक पदाच्या भरतीसाठी 100 गुणाची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे ज्यामध्ये 50 प्रश्नाचा समावेश असणार आहे. प्रत्येक प्रश्नाला २ मार्क अशा पद्धतीची परीक्षा घेतली जाणार आहे. (पेपर मध्ये सामान्य ज्ञान, गणिताचे प्रश्न)
- कोतवाल पदाच्या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची मुलाखत घेतली जाणार नाही आहे फक्त १०० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे लेखी गुणवत्तेनुसार आणि जो प्राधान्यक्रम ठरवण्यात आलेला आहे त्यानुसार महसूल सेवकाची निवड केली जाणार आहे.
- अंतिम २ उमेदवाराला जर समान गुण आले तर त्याच्यामध्ये जो काही महसूल सेवकाचा वारस असेल त्याला या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे. ज्या उमेदवाराचे वय जास्त असेल त्याला देखील त्या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे.
| एकूण गुण | १०० गुण |
|---|---|
| एकूण प्रश्न | ५० प्रश्न |
| गुण पद्धत | प्रत्येक बरोबर उत्तराला २ गुण |
| परीक्षेची वेळ | ६० मिनिटे (१ तास) |
आरक्षण
- अनुसूचित जाती
- अनुसूचित जमाती
- भटक्या जमाती
- विमुक्त जाती
- इतर मागासवर्ग
- ईडब्ल्यूएस
- महिला
- दिव्यांग
पात्रता आणि अटी
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे बंधनकारक आहे.
- उमेदवार हा ज्या तालुक्यातून अर्ज करणार आहे त्या तालुक्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे. तसेच अर्जासोबत महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र व लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- अर्जदार कमीत कमी इयत्ता ४थी उत्तीण असावा.
- अर्जदाराचे वय १८ ते ४० वर्ष दरम्यान असावे.
- निवड झालेल्या उमेदवारांनी शारीरिक क्षमतेबाबत वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागेल व चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
- मागासवर्गीय उमेदवारांनी सक्षम अधिकारी यांनी दिलेलं जात प्रमाणपत्र अंतिम निवडीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील. निवड होणाऱ्या मागासवर्गीय घटकातील उमेदवारांना जात वैद्यता प्रमाणपत्राच्या अधीन राहून तात्पुरती नियुक्ती दिली जाईल. जात वैद्यता प्रमाणपत्र सहा महिन्याच्या आत सादर करण्याच्या अटीवर बंधपत्र/शपथपत्र लिहून दिल्यानंतर अंतिम मुदतीत जात वैद्यता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. विहित मुदतीत जात वैद्यता प्रमाणपत्र सादर न केल्यास त्याची सेवा संपुष्टात येईल.
- अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती वगळून अन्य प्रवर्गातील मागासवर्गीय उमेदवारांना चालू आर्थिक वर्षाचे उत्पन्न व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतच्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत साक्षांकित करून आवेदन पत्रासोबत जोडावी. (नॉन क्रिमीलेअर चे तत्व अनुसूचित जाती/जमाती या प्रवर्गा व्यतिरिक्त अन्य सर्व मागास प्रवर्गांना लागू राहील.)
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांकरिता विहित करण्यात आलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
- उमेदवाराला अर्जासोबत लहान कुटुंबाच प्रतिज्ञापत्र जोडावे लागणार आहे म्हणजे ३ पेक्षा जास्त अपत्य नसल्याबाबतची अट सुद्धा याच्यासाठी लागू होईल.
- फक्त त्याच गावासाठी जाहिरात काढली जाईल ज्या गावासाठी कोतवाल सेवकाच्या जागा निघतील आणि त्याच गावातील रहिवाशी उमेदवाराला प्राधान्य दिलं जाणार आहे.
- ज्या गावासाठी महसूल सेवकाच्या जागा निघतील उमेदवार हा त्याच गावातील रहिवाशी असणे बंधनकारक आहे. तसेच उमेदवाराला अर्जासोबत स्थानिक रहिवाशी दाखला सादर करणे अनिवार्य आहे.
कोतवाल भरती अभ्यासक्रम
| विषय | समाविष्ट घटक |
|---|---|
| सामान्य ज्ञान | महाराष्ट्राचा आणि स्थानिक जिल्ह्याचा इतिहास, भूगोल, चालू घडामोडी आणि महसूल विभागाची मूलभूत माहिती. |
| मराठी भाषा | व्याकरण, समानार्थी/विरुद्धार्थी शब्द, म्हणी व वाक्प्रचार, शब्दसंग्रह. |
| अंकगणित व बुद्धिमत्ता | बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, टक्केवारी, सरासरी आणि सोपे प्रश्न. |
| स्थानिक माहिती | संबंधित जिल्ह्याची भौगोलिक माहिती, नद्या, तालुके आणि स्थानिक प्रशासन. |
कोतवाल भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे
- ओळख पुरावा: आधार कार्ड / मतदान कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स
- पत्त्याचा पुरावा: रेशन कार्ड / वीज बिल / आधार कार्ड
- वयाचा पुरावा: जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे: ४ थी / ८ वी / १० वी उत्तीर्ण गुणपत्रक
- स्थानिक रहिवाशी दाखला: संबंधित तालुक्याचा/गावाचा रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र.
- जात प्रमाणपत्र: मागासवर्गीय उमेदवारांसाठी आवश्यक
- जात वैधता प्रमाणपत्र: उपलब्ध असल्यास (किंवा नियुक्तीनंतर सादर करण्याचे हमीपत्र)
- नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र: लागू असलेल्या प्रवर्गासाठी चालू आर्थिक वर्षातील प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचे फोटो: अलीकडच्या काळातील ४ रंगीत फोटो
- चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र: पोलीस स्टेशन मधून मिळालेला दाखला
कोतवाल भरती अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत
- जाहिराती प्रसिद्ध झाल्यानंतर अर्ज भरण्याच्या तारखा दिल्या जातील आणि पुढच्या ज्या काही प्रक्रिया असतील त्या पार पाडल्या जातील. त्यामुळे महसूल सेवक भरतीच्या अपडेट आम्ही वेळोवेळी आमच्या पोर्टल वर देत राहू त्यामुळे विनंती आहे की नवीन अपडेट साठी आमच्या पोर्टल ला भेट देत रहा.
| लहान कुटुंबासाठी प्रतिज्ञापत्र | Click Here |