Magel Tyala Saur Krushi Pump Yojana - मागेल त्याला सौर कृषी पंप योजना
राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचा शेती हा पारंपारीक व्यवसाय आहे. ग्रामीण भागातील बहुतांश शेतकरी हे दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतात शेतकऱ्यांकडे शेती व्यतिरिक्त अन्य कोणतेच कमाईचे साधन नसल्या कारणामुळे त्यांची आर्थिक स्थिती कमजोर असते. त्यामुळे शेतकरी शेतीसाठी बँक, वित्तीय संस्था तसेच साहुकाराकडून जास्त व्याज दराने कर्ज घेतात व कष्ट करून शेती करतात. शेती करण्यासाठी पाण्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते त्यासाठी शेतकरी विहिर, बोअरवेल, नदी, नाले, कालवा यामधून डिझेल पंपाच्या सहाय्याने पाण्याचा उपसा करतात परंतु राज्यातील लोडशेडिंगमुळे विजेची अनियमितता निर्माण होते व त्यामुळे शेतकऱ्यांना शेती सिंचन करण्यासाठी समस्या निर्माण होते.
आज सुद्धा राज्याच्या ग्रामीण भागात काही ठिकाणी वीज उपलब्ध नाही व महाग डिझेल पंप आणि वाढत्या डिझेल च्या किमतीमुळे शेतकऱ्यांना खर्चाच्या दृष्टीने डिझेल पंप विकत घेणे परवडण्यासारखे नसते. परिणामी शेतकऱ्यांना पाण्याचा उपसा करण्यासाठी वीज उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या हाथा-तोंडाशी आलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते व त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतो. शेतकरी आधीच कर्ज घेऊन शेती करत असतो व पाण्याअभावी शेतीचे अशा प्रकारे नुकसान झाल्यामुळे त्यांना कर्ज फेडता येत नाही व त्यामुळे शेतकरी आत्महत्या करतात.
दिवसा लोडशेडिंग मुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होत नाही व रात्री विजेच्या उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांना रात्री काळोखात शेती ला पाणी देण्यासाठी जावे लागते त्यामुळे रात्री जंगली जनावर शेकऱ्यांवर हल्ला करतात व त्यांना जखमी करतात तसेच साप, विंचू हे दंश करतात त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री सिचन करताना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून महाराष्ट्र सरकार ने शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना (Magel Ttyala Saur Krushi Pump Yojana)सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सौर पंप बसवण्यासाठी 95% अनुदान दिले जाते त्यामुळे या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना स्वतःकडील फक्त 5% रक्कम भरावी लागते.
राज्यातील अनेक शेतकरी इलेक्ट्रिक पंपाने तसेच डिझेल पंपाने पिकांचे सिंचन करतात परंतु डिझेल पंप आणि विजेचे पंप पैशाच्या दृष्टीने खुप महाग असतात तसेच डिझेल पंपाला मोठ्या प्रमाणात डिझेल ची आवश्यकता असते व इलेक्ट्रिक पंपाला देखील मोठ्या प्रमाणात विजेची आवश्यकता असते. त्यामुळे डिझेल आणि इलेक्ट्रिक पंप शेतकऱ्यांना परवडण्यासारखे नसतात याउलट सौर पंप डिझेल आणि विद्युत पंपाच्या तुलनेत स्वस्त असतात तसेच सौर पंपाला डिझेल आणि विजेची आवश्यकता नसते त्यामुळे सौर पंप शेतकऱ्यांना परवडण्यासारखे असतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरु करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला.
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 1 लाख सौर पंपाचे टप्या टप्याने वाटप करण्यात येणार आहे.
सर्व कृषीपंप ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी 63 केव्हीए / 100 केव्हीए क्षमतेचे विद्युत रोहित्र उभारण्यात येतात व त्या रोहीत्रावरील लघुदाब वाहिनीद्वारे कृषीपंपाना वीज पुरवठा करण्यात येतो. लघुदाब वाहिनीची लांबी वाढल्याने कमी दाबाने वीज पुरवठा होणे, विद्युत पुरवठयामध्ये वारंवार बिघाड होऊन वीज पुरवठा खंडीत होणे, तांत्रिक वीज हानी वाढणे, रोहीत्र बिघाड होण्याच्या प्रमाणात वाढ, विद्युत अपघात, विद्युत चोरी या सारख्या समस्यांमुळे अखंडीत व शाश्वत वीज पुरवठा करण्याचे उद्दीष्ट साध्य होण्यास अडचणी निर्माण होतात.
याशिवाय, जेथे वीजेचे जाळे उपलब्ध नाही तेथे डिझेल इंधनाचा वापर करुनही कृषीपंप चालविले जातात. इंधनाची वाढलेली किंमत, आयातीवर होणारा खर्च, परकीय चलनात द्यावी लागणारी किंमत या बाबीही विचारात घेण्याजोग्या आहेत. याला पर्याय म्हणून राज्यात शेतकऱ्यांना कृषी वापरासाठी पारेषण विरहित सौर कृषीपंप उपलब्ध केल्यास वरील सर्व समस्यांवर मात करता येऊ शकते आणि त्याचे दृष्य स्वरुपातील फायदे पुढील काळात मिळतील, यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र मोठया प्रमाणावर राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला.

महत्वाच्या गोष्टी
- शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना
- सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ १० टक्के रक्कम भरून सौर पॅनेल्स व कृषी पंपाचा पूर्ण संच
- अनुसूचित जाती - जमातींच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा ५ टक्के
- उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान
- जमिनीच्या क्षेत्रानुसार ३ ते ७.५ एचपीचे पंप
- पाच वर्षांची दुरुस्ती हमी, इन्शुरन्स सह
- वीजबिल नाही, लोडशेडिंगची चिंता नाही
- सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा
शेतकऱ्याला दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे व राज्य शासनाची पारंपारिक पध्दतीने कृषीपंप जोडणीसाठी लागणाऱ्या खर्चात व राज्य शासनाद्वारे सबसीडीपोटी देण्यात येणाऱ्या अनुदानात बचतीचे उद्दिष्ट साध्य व्हावे याकरीता राज्यातील शेतकऱ्यांना कृषी वापरासाठी पारेषण विरहीत 1 लाख सौर कृषीपंप टप्याटप्यात उपलब्ध करुन देण्याच्या मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेस या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली.
या योजनेअंतर्गत पुढील 3 वर्षांच्या कालावधीत टप्याटप्याने 1 लाख सौर कृषीपंप आस्थापित करण्यात येतील. पहिल्या टप्यात 25 हजार नग सौर कृषीपंप, दुसऱ्या टप्प्यात 50 हजार नग सौर कृषी पंप व तिसऱ्या टप्यात 25 हजार नग सौर कृषीपंप आस्थापित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
| योजनेचे नाव | मागेल त्याला सौर कृषी पंप योजना |
| लाभार्थी | राज्यातील शेतकरी |
| लाभ | 95% सौर कृषिपंप अनुदान |
| उद्देश्य | सौर पंप विकत घेण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देणे |
| अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे उद्दिष्ट - Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Purpose
- शेतकऱ्याला सिंचन करणे शक्य व्हावे व राज्य शासनाची पारंपारिक पद्धतीने कृषीपंप जोडणीसाठी लागणाऱ्या खर्चाच्या बचतीचे उद्दिष्ट साध्य व्हावे याकरिता राज्यातील कृषी वापरासाठी पारेषण विरहित 1 लाख सौर कृषी पंप टप्प्याटप्प्यात उपलब्ध करुन देण्याकरिता राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरु करण्यात आली आहे.
- राज्यातील शेतकऱ्यांची शेतात सिंचनासाठी लागणाऱ्या विजेच्या बिलापासून आणि डिझेल पंपासाठी लागणाऱ्या डिझेल खर्चापासून सुटका करने या योजनेचा उद्देश आहे.
- शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- शेतकऱ्यांना सौर पंप विकत घेण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देणे या योजनेचा उद्देश आहे.
- डिझेल पंपामुळे होणारे वायू प्रदूषण कमी करने.
- राज्यातील शेतकऱ्यांचा सामाजिक व आर्थिक विकास करने त्यांचे जीवनमान सुधारणे तसेच त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे या योजनेचा उद्देश आहे.
- शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहित करणे.
- शासनावर विजेचा भार कमी करण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- वीज अनुदानापासून कृषी सिंचन वेगळे करणे.
- व्यावसायिक, औद्योगिक आणि घरगुती वीज ग्राहकांवरील सब्सिडीचा भार कमी करणे.
- शेतकऱ्यांची वीज बिलातून मुक्तता करणे.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे वैशिष्ट्य - Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Features
- सदर योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी महावितरण कंपनीवर टाकण्यात आली असून योजना यशस्वीरित्या राबविण्याच्या दृष्टीने व सौरपंप घेण्यासाठी अर्जदारांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल समजले जाते आहे.
- राज्यातील शेतकऱ्यांना सौर पंप विकत घेण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली एक महत्वपूर्ण योजना आहे.
- या योजनेला अटल सौर कृषिपंप योजना नावाने देखील ओळखले जाते.
- लाभार्थी निवडीचे निकषात अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांचा प्राधान्य देण्यात येईल.
- राज्यातील शेकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास तसेच त्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास होण्यासाठी व त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनवण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना फायद्याची ठरणार आहे.
- योजनेत लाभार्थी निवडीची प्रक्रिया कमी अवधीत पूर्ण होण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरीय समिती रद्द करुन लाभार्थ्यांची निवड करण्याकरिता महावितरणद्वारे ऑनलाईन पोर्टल तयार करण्यात आलेले आहे, ज्यामध्ये अर्जदाराला विहित नमुन्यातील अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा असेल. त्यामुळे अर्जदार घरी बसुन मोबाईल च्या सहाय्याने अर्ज करू शकतात त्यामुळे अर्जदाराला सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही व त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोघांची बचत होईल.
- या योजनेअंतर्गत अनुदानाची रक्कम लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे लाभार्थी - Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Beneficiary
- महाराष्ट्र राज्यातील डिझेल पंप वापरणारे शेतकरी
- राज्यातील पारंपारिक ऊर्जेद्वारे विद्युतीकरण न झालेले शेतकरी
- दुर्गम व आदिवासी भागातील शेतकरी
- महाराष्ट्र शासनाच्या सिंचन योजनेअंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी
- वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, नदी / विहिर / बोअरवेल यांचे शेजारील शेतजमीनधारक शेतकरी या योजनेत पात्र राहतील.
- यापुर्वी शासनाच्या कुठल्याही योजनेद्वारे कृषीपंपाचा लाभ न घेतलेले शेतकरी
- वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याने अद्याप विदयुतीकरण न झालेल्या गावातील शेतकरी
- धडक सिंचन योजना अंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी
- महावितरणकडे विदयुत जोडणीसाठी पैसे भरुन प्रलंबित असलेले शेतकरीअर्जदार
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीचे निकष
- सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध आहे, असे सर्व शेतकरी पात्र राहतील. मात्र अशा शेतकऱ्यांकडे पारंपारिक पध्दतीने विद्युत जोडणी झालेली नसणे आवश्यक आहे.
- 5 एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास 3 अश्वशक्ती क्षमते पर्यंतचे सौर कृषी पंप व 5 एकरापेक्षा जास्त शेतजमीन धारक शेतकऱ्यास 5 अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषी पंप देय राहील.
- राज्यातील पारंपरिक ऊर्जेव्दारे विद्युतीकरण न झालेले शेतकरी,विद्युतीकरणासाठी वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेले शेतकरी, महावितरण कंपनीकडे विद्युत जोडणीसाठी पैसे भरूनही प्रलंबित असणाऱ्या ग्राहकांपैकी/शेतकऱ्यांपैकी, ज्यांना नजीकच्या काळात विद्युत जोडणी मिळणे शक्य नाही असे शेतकरी, अतिदुर्गम भागतील शेतकरी, महाराष्ट्र शासनाच्या धडक सिंचन योजने अंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी यांना सदर योजने अंतर्गत प्राधान्य राहील.
- वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, बारमाही वाहणारी नदी/नाले यांच्या शेजारील शेतजमीन धारक शेतकरी सुध्दा या योजनेसाठी पात्र राहतील.
- सदर योजनेंतर्गत सौर कृषी पंपासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांकडून 10 टक्के व अनुसूचित जातीच्या व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरीता 5 टक्के लाभार्थी हिस्सा म्हणून भरणे लाभार्थ्यास आवश्यक राहील.
- २.५ एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास ३ अश्वशक्ती क्षमते पर्यंतचे सौर कृषीपंप, २.५१ ते ५ एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास ५ अश्वशक्ती क्षमतेचा आणि ५ एकरावरील शेतजमीन धारक शेतकऱ्यास ७.५ अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप देय राहील. तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषीपंपाचे मागणी केल्यास तो अनुज्ञेय राहील.
- वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहिर, बोअरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी/नाले यांच्या शेजारील शेतजमीनधारक शेतकरी सुध्दा या योजनेसाठी पात्र राहतील.
- ज्या शेतकऱ्यांकडे बोअरवेल, विहिर व नदी इ. ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्त्रोत आहे याची खात्री महावितरणद्वारे करण्यात येईल. तथापि, जलसंधारण कामाच्या पाणी जिरविण्याच्या पाणीसाठ्यामधून पाणी उपसण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाहीत.
- अटल सौर कृषी पंप योजना-१, अटल सौर कृषी पंप योजना-२ व मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना या योजनांचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील या अभियानांतर्गत लाभास पात्र असतील.
परिपत्रके / शासन निर्णय
| परिपत्रके | येथे क्लिक करा |
| शासन निर्णय | येथे क्लिक करा |
पुरवठादार यादी
| पुरवठादार यादी | येथे क्लिक करा |
तक्रार निवारण
| तक्रार नोंदवा | येथे क्लिक करा |
| तक्रारीच्या स्थितीचा मागोवा घ्या (लाभार्थी) | येथे क्लिक करा |
| सामान्य तक्रार नोंदवा | येथे क्लिक करा |
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत दिली जाणारी अनुदानाची रक्कम - Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Subsidy
- या योजनेंतर्गत सर्वसाधारण लाभार्थ्यांकरीता सौर कृषीपंपाच्या केंद्रीय आधारभूत किंमतीच्या 10 टक्के, अनुसूचित जाती/जमातीच्या लाभार्थ्यांचा 5 टक्के हिस्सा राहील.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना होणारा फायदा - Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Benefits
- मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना सौर पंप विकत घेण्यासाठी 95% अनुदान दिले जाते.
- ज्या शेतकऱ्यांकडे 5 एकर पेक्षा जास्त शेतजमीन आहे त्यांना 3 HP सौर पंप आणि मोठी शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना 5 HP सौर पंप उपलब्ध करून दिले जातात.
- मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत राज्य शासनाद्वारे 3 टप्यात 1 लाख सौर पंप उपलब्ध करून देण्याचा निर्धार केला गेला आहे त्यात पहिल्या टप्यात 25 हजार सौर पंप व दुसऱ्या टप्यात 50 हजार सौर पंप आणि तिसऱ्या टप्यात 25 हजार सौर पंपाचे वाटप करण्यात येणार आहे.
- मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेच्या सहाय्याने शासनावरील विजेचा अतिरिक्त भार कमी होईल.
- या योजनेअंतर्गत शेतातील जुने डिझेल पंप बदलून त्या जागी नवीन सौर पंप बसवण्यात येणार आहेत त्यामुळे राज्यातील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.
- मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची वीज व डिझेल च्या बिलातून सुटका होईल.
- शेतकऱ्यांची वीज लोडशेडिंग पासून सुटका होईल.
- मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सौर पंपाच्या सहाय्याने शेतकऱ्यांना दिवसा शेती सिंचन करणे शक्य होईल.
- लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सौर कृषी पंपासोबत दोन एलईडी डीसी बल्ब, एक डीसी पंखा व एक मोबाईल चार्जिंग सॉकेट समाविष्ट करण्यात आलेले आहे.
- डिझेल पंपाच्या तुलनेत सौर पंपाचा शून्य परिचलन खर्च येतो.
- सौर पंपाच्या उपयोगामुळे पर्यावरणाला याचा काहीच धोका निर्माण होणार नाही.
- या योजनेच्या सहाय्याने औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती वीज ग्राहकांवरील क्रास सबसिडीचा बोजा कमी होईल.
- सौर कृषीपंपासोबत 2 डि.सी. एल.ई.डी बल्ब, मोबाईल चार्जिंग व बॅटरी चार्जिंगची सुविधा (बॅटरी लाभार्थांनी घ्यावी) यांचा समावेश करण्यात येईल.
- शेतात सौर पंप बसवल्यामुळे शेतकऱ्यांना डिझेल व विजेच्या खर्चिक पंपा पासून तसेच त्यांना लागणाऱ्या विजेच्या बिलापासून व डिझेल पासून सुटका मिळेल व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.
अटल सौर कृषी पंप योजना अंतर्गत वर्गवारी निहाय लाभार्थी हिस्सा
| वर्गवारी | लाभार्थी हिस्सा |
3 HP लाभार्थी हिस्सा |
5 HP लाभार्थी हिस्सा |
7.5 HP लाभार्थी हिस्सा |
|---|---|---|---|---|
| सर्वसाधारण | 10% | 16560/- रुपये | 24710/- रुपये | 33455/- रुपये |
| अनुसूचित जाती | 5% | 8280/- रुपये | 12355/- रुपये | 16728/- रुपये |
| अनुसूचित जमाती | 5% | 8282/- रुपये | 12355/- रुपये | 16728/- रुपये |
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे भौतिक उद्दिष्टांचे वाटप व आर्थिक भार खालीलप्रमाणे आहे
| पंपाचा प्रकार | सर्वसाधारण गटाचे लाभार्थी |
अनुसूचित जातीचे लाभार्थी |
अनुसूचित जमातीचे लाभार्थी |
एकूण नग | पंपाची आधारभूत किंमत |
आर्थिक भार (रुपये कोटीत) |
|---|---|---|---|---|---|---|
| 3HPDC | 4928 | 738 | 584 | 6250 | 255000 | 159,375 |
| 5HPAC | 2957 | 443 | 350 | 3750 | 325000 | 121,875 |
| 5HPDC | 11826 | 1772 | 1402 | 15000 | 385000 | 577,500 |
| एकूण | 19711 | 2953 | 2336 | 25000 | - | 858,75 |
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता - Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Eligibility
- अर्जदार शेतकरी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- पाण्याचा खात्रीशीर स्रोत असलेले शेतकरी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.
- धडक सिंचन योजनेचे लाभार्थी शेतकरी
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे नियम व अटी - Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Terms & Conditions
- फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेचा लाभ दिला जाईल.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- फक्त शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
- राज्यातील ज्या शेजाऱ्यांच्या शेतात आधीच वीज जोडणी केली गेली आहे त्यांना मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- एका शेतात फक्त एकदाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
- सौर कृषीपंप आस्थापित झाल्यानंतर तो संबंधित लाभार्थ्यांस हस्तांतरीत करण्यात येईल. त्यानंतर त्याची दैनंदिन सुरक्षितता करण्याची जबाबदारी संबंधित लाभार्थीची राहील.
- योजनेची अंमलबजावणी करतांना अर्जदार शेतकऱ्याच्या शेतात बोर वेल, विहिर, नदी इ. शाश्वत पाण्याचा स्त्रोत आहे याची महावितरणद्वारे खात्री करुनच अशा अर्जदाराचाही विचार केला जाईल.
- जर शेतकऱ्याने केंद्र व राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या अन्य योजनेअंतर्गत सौर पंपाचा लाभ मिळवला असेल तर त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- शेतजमिनीत सह हिस्सेदार असल्यास त्यांचे ना हरकत प्रमाण पत्र
- सदर योजनेअंतर्गत सौर कृषीपंपासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांकडून 10 टक्के व अनुसूचित जातीच्या / अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरिता 5 टक्के लाभार्थी हिस्सा म्हणून लाभार्थ्यास भरणे आवश्यक आहे.
- अर्जदार शेतकऱ्याच्या शेतात विहिर किंवा कूपनलीका यापैकी जलस्त्रोत असणे आवश्यक आहे.
- अद्यावत भूजल अंदाज अहवालानुसार अतिशोषित, शोषीत आणि अंशतः शोषीत क्षेत्रामधील (गावांमधील) विहीरींमध्ये व कूपनलीकांमध्ये नवीन सौर पंप देणे अनुज्ञेय असणार नाही.
- अद्यावत भूजल अंदाज अहवालानुसार ज्या सुरक्षीत पाणालोट क्षेत्रांची उपशाची स्थिती (stage of extraction) 60 टक्के पेक्षा कमी आहे, अशा क्षेत्रातील गावांमधील विहीरींमध्ये व कूपनलीकांमध्ये नवीन सौर पंप देण्यास पात्र असतील.
- खडकाचे क्षेत्रात खोदल्या जाणाऱ्या विंधन विहीरी हे शाश्वत सिंचनाचे साधन नसल्यामुळे विंधन विहीरींमध्ये (Bore Well), नवीन सौर पंप देणे अनुज्ञेय आसणार नाही. मात्र गाळाचे क्षेत्रामध्ये खोदल्या जाणा-या कूप नलिका हे शाश्वत सिंचनाचे साधन असल्यामुळे सुरक्षीत क्षेत्रामधील कूपनलीकांमध्ये (Tube Well) नवीन सौर पंप देणे अनुज्ञेय असणार आहे.
- कोणत्याही वर्गवारीतील क्षेत्रामध्ये 60 मी. पेक्षा जास्त खोल असलेल्या विहीरींमध्ये अथवा कपनलिकेमध्ये नवीन सौर पंप देण्यास पात्र नाही.
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे - Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Documents
- आधार कार्ड
- राशन कार्ड
- निवास प्रमाण पत्र
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- बँक खात्याचा तपशील
- शेतीची कागदपत्रे
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द होईल.
- अर्जदार शेतकऱ्याच्या शेतात वीज जोडणी असल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.
- अर्जदार शेतकऱ्याने केंद्र व राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या अन्य योजनेअंतर्गत सौर पंपाचा लाभ मिळवला असेल तर त्याचा अर्ज रद्द करण्यात येईल.
- अर्जदार शेतकऱ्याच्या शेतात आधीपासून सौर पंप उपलब्ध असल्यास
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत - Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Online Registration
- अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर Beneficiary Services मध्ये Apply वर क्लिक करावे लागेल
- आता तुमच्यासमोर मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती निवडून व विचारलेली सर्व कागदपत्रे जोडून अर्ज सबमिट करावा लागेल
- अशा प्रकारे तुमची मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना अंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.


मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या अर्जाची स्थिती जाणून घेण्याची पद्धत - Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Application Status
- अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर लाभार्थी सुविधा मध्ये अर्जाची सद्यस्थिती वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला अर्ज क्रमांक टाकून शोधा बटनावर क्लिक करावे लागेल.
- आता तुम्हाला तुमच्या स्क्रीन वर तुमच्या अर्जाची सर्व स्थिती दिसेल.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत देयकाची रक्कम भरणा करण्याची पद्धत
- अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर अर्जाची स्थिती मध्ये देयकाची रक्कम भरणा करा वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला अर्ज क्रमांक टाकून शोधा बटनावर क्लिक करावे लागेल.
- आता एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुम्हाला भरणा करायचा आहे.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत पुरवठादाराची यादी बघण्याची पद्धत
- अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर अर्जाची स्थिती मध्ये पुरवठादार यादी मध्ये सूचिबद्ध केलेल्या पुरवठादाराची यादी वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुमच्या क्षेत्राची माहिती निवडायची आहे.
- सर्व माहिती भरून झाल्यावर शोधा बटनावर क्लिक करायचं आहे.
- आता तुमच्या स्क्रीन वर तुमच्या क्षेत्रातील पुरवठादारांची यादी दिसेल.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत वारंवार विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न 1.सौर कृषीपंप म्हणजे काय?
उत्तर: सौर कृषीपंप हा सुर्याच्या किरणांपासून म्हणजेच सौर ऊर्जेपासुन चालणारा पंप आहे. सौर पंपामध्ये मुख्यत: सोलर पॅनल, वॉटर पंप संच, पंप नियंत्रण उपकरणे तसेच इतर आवश्यक साहित्याचा समावेश आहे.
प्रश्न 2. सौर कृषीपंपाचा उपयोग काय आहे ?
उत्तर: सौर कृषीपंप हा शेततळे, विहिर, बोअरवेल इ. शाश्वत पाण्याचा स्त्रोत मधुन पाण्याचा उपसा करण्याचे काम करतो. उपसा केलेले पाणी हे पाईपद्वारे शेतातील पिकांना देण्यास मदत होते.
प्रश्न 3. सौर कृषीपंप कसा काम करतो ?
उत्तर: सौर कृषीपंप सौर ऊर्जेवर म्हणजेच सुर्याच्या किरणांपासून काम करतो. जेव्हा सुर्यकिरणे सोलर पॅनल्सवर पडतील तेव्हा डीसी उर्जा निर्माण होऊन सौर कृषीपंप कार्यान्वित होतो व पाण्याचा उपसा केला जाऊ शकतो. कृषीपंप सौर ऊर्जेवर चालणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचनाकरीता योग्य आहे.
प्रश्न 4. पारंपारिक विद्युत पंपापेक्षा सौर कृषीपंप अधिक उपयुक्त कसे आहे ?
उत्तर:
- सौर कृषीपंप चालविण्यासाठी कोणत्याही इंधन किंवा पारंपारिक विजेची आवश्यकता नाही. एकदा स्थापित केल्यावर सौर कृषीपंप वीज किंवा इंधनाचा आवर्ती खर्च करत नाही.
- वीज कपात, कमी दाबाचा विजपुरवठा, सिंगल फेज समस्या किंवा मोटर जळाल्यामुळे प्रभावित होत नाही.
- सौर कृषीपंप दुर्गम भागात स्थापित केले जाऊ शकतात जेथे विज खांब टाकणे कठीण आहे.
- डीझल पंपाच्या तुलनेत सौर कृषीपंपाचा देखभाल खर्च फारच कमी असून हा पंप दीर्घकाळ टिकतो.
- सौर कृषीपंपाला लुब्रिकेंटची/तेलाची आवश्यकता नसते आणि त्यामुळे पाणी, माती दूषित होण्याची शक्यता नसते.
- सौर कृषीपंपाचे संचालन अतिशय सोपे असून अत्यंत फायदेशीर आहे.
- सौर कृषीपंपामुळे आपल्याला दिवसा पाण्याचा उपसा करणे शक्य होते.
प्रश्न 5. मागेल त्याला सौर कृषी पंप योजना काय आहे ?
उत्तर: ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्त्रोत आहे व ज्या शेतकऱ्यांकडे शेतीच्या सिंचनाकरीता पारंपारिक पध्दतीने विजपुरवठा नाही, अशा शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यात सौर कृषीपंप आस्थापित करण्यात येणार आहेत.
प्रश्न 6. यापुर्वी सौर कृषीपंप योजना राज्यात राबविण्यात आली आहे काय ?
उत्तर: सौर ऊर्जेचे महत्व लक्षात घेऊन राज्य शासनाद्वारे महारष्ट्रात सन २०१५ पासून सौर कृषीपंपाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. यापूर्वी अटल सौर कृषीपंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना राबविण्यात आली होती. तसेच सद्यपरिस्थितीत प्रधानमंत्री कुसुम घटक - ब योजने अंतर्गत सौर कृषी पंप आस्थापित करण्यात येत आहे. राज्यात दि. ०६.०९.२०२४ रोजी पर्यंत 2,63,156 सौर कृषीपंप बसविण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना या सौर ऊर्जेचा मिळालेला लाभ तसेच सौर कृषीपंपा बाबत शेतकऱ्यांचा प्रतिसाद लक्षात घेऊन राज्य शासनाने मागेल त्याला सौर कृषी पंप योजना जाहीर केली आहे.
प्रश्न 7. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा फायदा कोणाला मिळणार आहे ?
उत्तर: ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्त्रोत आहे व ज्या ठिकाणी यापूर्वी पारंपारिक कृषीपंपाकरीता वीजपुरवठा देण्यात आला नाही, अशा सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. महावितरणकडे पैसे भरुन प्रलंबित असलेल्या शेतक-यांना प्राधान्य देण्यात येईल.
प्रश्न 8. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेकरिता पात्र लाभार्थ्यांना अर्ज करण्याची काय पध्दत आहे ?
उत्तर: या योजने अंतर्गत नवीन सौर कृषीपंप मिळण्याकरीता महावितरणतर्फे स्वतंत्र वेब पोर्टल निर्माण करण्यात आले आहे. वेबपोर्टलवरुन किंवा https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index_mr.php या link वर जाऊन, अर्जदारास A-1 अर्ज ऑनलाईन भरायचा आहे. सदर अर्ज अगदी साधा व सोपा असून, अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करवयाचे आहे.
प्रश्न 9. या योजने अंतर्गत अर्जासोबत कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत ?
उत्तर: शेतक-यांकडे असलेल्या शेतीचा 7/12 उतारा (जाल्स्त्रोताची नोंद आवश्यक आहे), आधारकार्ड, जातीचे प्रमाणपत्र (अनुसुचित जाती/ जमाती लाभार्थींसाठी) या कागदपत्रांची सत्यप्रत आवश्यक आहे. अर्जदार स्वत: शेतजमिनीचा एकटा मालक नसेल, तर इतर हिस्सेदारांचा / मालकांचा ना हरकत दाखला देणे बंधनकारक आहे. पाण्याचा स्त्रोत डार्क झोन मध्ये असल्यास भुजल सर्वेक्षण विभागातर्फे ना हरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. या व्यतिरिक्त संपर्काकरीता ग्राहकांचा मोबाईल क्रमांक, ईमेल पत्ता (असल्यास), पाण्याचे स्त्रोत व त्याची खोलीची माहिती अर्जामध्ये भरणे आवश्यक आहे.
प्रश्न 10. अर्ज केल्यानंतर अर्जाबाबतची माहिती कशी मिळेल ?
उत्तर: लाभार्थी अर्जदाराने ऑनलाईन अर्ज सादर करताच अर्जदारास त्याचे मोबाईल क्रमांकावर लाभार्थी क्रमांक व इतर तपशील एसएमएस द्वारे कळविण्यात येईल तसेच विविध टप्प्यावर अर्जाची सद्य:स्थितीची माहिती अर्जदारास त्याचे मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे कळविण्यात येईल. याव्यतिरिक्त, अर्जदारास वेबपोर्टलवर जावून लाभार्थी क्रमांकच्या आधारे अर्जाची सध्यस्थिती बघता येईल.
प्रश्न 11. सौर कृषीपंप लावताना जागेची निवड कशी करावी ?
उत्तर: सौर कृषीपंप पूर्ण कार्यक्षमतेने चालविण्यासाठी जिथे सूर्याची किरणे सोलर पॅनलवर पूर्णपणे पडतील, कुठल्याही प्रकारची सावली अथवा आडोसा त्यावर येणार नाही तसेच पॅनलवर धूळ, घाण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. सोलर पॅनल सूर्यकिरणांच्या दिशेने फिरण्यास वाव असेल अशा ठिकाणी बसविण्यात यावा तसेच जमिनीचा भूभाग हा समपातळीवर असावा. सोलर पॅनल शक्यतो पाण्याच्या स्रोताजवळ व अशा ठिकाणी लावावा जेणेकरून तो सहज स्वच्छ करता येईल. सोलर पंप हा सोलर पॅनेलच्या जवळच असला पाहिजे. परंतु ज्या क्षेत्रामध्ये सिंचन करावयाचे आहे त्याच क्षेत्रात असला पाहिजे.
प्रश्न 12. स्थापित केलेला सौर कृषीपंप एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलविणे शक्य आहे काय ?
उत्तर: एकदा स्थापित केलेला सौर कृषीपंप पुन्हा स्थापन करणे किंवा दुसऱ्या ठिकाणी हलवणे योग्य नाही. शासन शुद्धीपत्रक दि. ०५.०३.२०२४ अन्वये, सौर कृषीपंप आस्थापित केलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना सदर सौर कृषीपंपाची विक्री अथवा हस्तांतरण करण्यास बंदी राहील. लाभार्थी शेतकऱ्यांनी अशा सौर कृषीपंपांची विक्री अथवा हस्तांतरण केल्यास त्यांचेविरुध्द महावितरण कंपनी यांचेद्वारे गुन्हा दाखल करण्यात येईल.
प्रश्न 13. सदर योजनेमध्ये भाग घेण्यासाठी किती पैसे भरावे लागतील ?
उत्तर: सदर योजनेमध्ये भाग घेण्यासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांकडुन सौर कृषी पंप किंमतीच्या 10 टक्के रक्कम व अनुसुचित जाती, अनुसुचित जमातीच्या लाभार्थ्यांकडुन सौर कृषी पंप किंमतीच्या 5 टक्के एवढी रक्कम भारवी लागेल.
प्रश्न 14. सदर योजनेकरिता लागणाऱ्या सौर कृषीपंपाची क्षमता कशी निर्धारित करावी ?
उत्तर: या योजनेअंतर्गत २.५ एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास ३ अश्वशक्ती क्षमतेचा, २.५१ ते ५ एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास ५ अश्वशक्ती क्षमतेचा आणि ५ एकरावरील शेतजमीन धारक शेतकऱ्यास ७.५ अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप देय राहील. तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषीपंपाचे मागणी केल्यास तो अनुज्ञेय राहील.
प्रश्न 15. सौर कृषीपंपाचे फायदे काय आहेत ?
उत्तर:
- शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार आहे.
- वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे, कमी वीजेच्या दाबामुळे किंवा सिंगल फेजमुळे सिंचनावर कोणताही परिणाम होणार नाही.
- विजेचा किंवा डिझेलचा वापर नसल्यामुळे वीज बिलाचा किंवा डिझेलचा खर्च नाही.
- कमीतकमी रखरखावची आवश्यकता.
- विजेची तार तुटून किंवा पोल पडून विद्युत अपघाताचा धोका नाही.
- पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत.
प्रश्न 16. नैसर्गिक आपत्तीमुळे म्हणजेच वीज, वादळ, गारा यामुळे सौर पॅनलचे नुकसान होईल काय? त्यासाठी काय उपाययोजना करणे आवश्यक आहे?
उत्तर: सध्या बाजारात उपलब्ध असलेले सोलर पॅनल हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवले असून क्वचितच वीज, वादळ, गारा या नैसर्गिक आपत्तीमुळे त्याचे नुकसान होते. एखाद्याच दुर्मिळवेळी वीज पडल्यामुळे सौर पॅनेलचे नुकसान होऊ शकते. हा धोका टाळण्यासाठी सौर पंपासोबत वीज संरक्षण यंत्र (Lighting Arrestor) बसविण्यात येणार आहे.
प्रश्न 17. सौर कृषीपंपाची देखभाल व दुरुस्तीचा कालावधी किती असणार आहे ?
उत्तर: सदर सौर कृषीपंपाची देखभाल व दुरूस्तीचा कालावधी 5 वर्ष राहणार आहे. या कालावधीत सौर कृषीपंप नादुरूस्त झाल्यास दुरूस्ती व देखभालीसाठी निश्चित केलेल्या कालावधीत विनामुल्य दुरुस्ती करण्याची जबाबदारी एजन्सीची राहणार आहे. शेतकऱ्यांने सौर कृषीपंप नादुरूस्त झाल्यास महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक तक्रार सेवा केंद्राला तसेच संबंधित एजन्सीच्या ग्राहक सेवा केंद्राला तत्काळ कळविणे आवश्यक आहे.
प्रश्न 18. शेतकऱ्यांना कोणती दैनंदिन देखभाल करावयाची आहे ?
उत्तर: सौर कृषीपंपाला अत्यंत कमी देखभाल करण्याची आवश्यकता असते. साधारणत: सौर पॅनल वर कचरा किंवा धुळ बसल्यामुळे त्याची कार्यक्षमता कमी होते. सौर पॅनलवरील धुळ वेळोवेळी व ओल्या कापडाद्वारे स्वच्छ केल्याने कार्यक्षमता योग्य राहते.
प्रश्न 19. सौर कृषीपंपाच्या साहित्याची चोरी झाली किंवा नुकसान झाल्यास काय करावे ?
उत्तर: सौर कृषीपंपाच्या साहित्याची चोरी झाल्यास त्वरित त्याची तक्रार नजिकच्या पोलीस ठाण्यात प्रथम खबरी अहवालाद्वारे (FIR) दाखल करावी. तसेच त्याची माहिती महावितरण कार्यालयास व संबंधित एजन्सीच्या ग्राहक सेवा केंद्राला देण्यात यावी. सौर कृषीपंपाचा 5 वर्षाकरिता पंप आस्थापित करणाऱ्या एजन्सीद्वारे विमा उतरविण्यात येतो त्यामुळे सदर लाभार्थींचा सौर पंप, विमा कंपनीकडून नुकसान भरपाई करीता पात्र ठरेल. विमा कंपनीकडुन नुकसानभरपाई करीता पंप आस्थापित करणारी एजन्सी सहकार्य करेल.
प्रश्न 20. सौर कृषीपंप नादुरुस्त झाल्यास शेतकऱ्यांनी कुठे तक्रार करावी.
उत्तर: सौर कृषीपंपाबाबत शेतकऱ्यांची काही तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक तक्रार सेवा केंद्राशी संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी. यासाठी महावितरणचे टोल फ्री क्रमांक १८००-२३३-३४३५ किंवा १८००-२१२-३४३५ उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. मध्यवर्ती ग्राहक तक्रार सेवा केंद्राकडे आलेली तक्रार संबंधित एजन्सीकडे पाठविण्यात येईल. सदर एजन्सीकडून शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येईल.
प्रश्न 21. अर्जदार शेतक-यास ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अडचणी आल्यास काय करावे?
उत्तर: एखाद्दा अर्जदार शेतक-यास ऑनलाईनद्वारे अर्ज करण्यासाठी अडचणी आल्यास महावितरणच्या तालुका स्तरावरील उपविभागीय कायार्लयाशी संपर्क साधावा. याशिवाय महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राशी संपर्क साधावा. यासाठी महावितरणचे टोल फ्री क्रमांक १८००-२३३-३४३५ किंवा १८००-२१२-३४३५ उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
| मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अधिकृत पोर्टल | येथे क्लिक करा |
| मागेल त्याला सौर कृषी पंप योजना पत्ता | हॉंगकॉंग बँक बिल्डींग, एम. जी. रोड, फोर्ट, मुंबई - 400 001 |
| मागेल त्याला सौर कृषी पंप योजना संपर्क | 1800-212-3435 1800-233-3435 |