शेळी मेंढी गट वाटप योजना : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना | अनुदान, पात्रता व ऑनलाईन अर्ज प्रक्रिया


मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ही महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागामार्फत राबविण्यात येणारी अत्यंत महत्त्वाची अशी योजना आहे. ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार, शेतकरी, शेतमजूर, महिला बचत गट आणि पारंपारिक पशुपालक यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणे आणि पशुपालनाला व्यवसायाचे स्वरूप देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.


मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना अंतर्गत राबविण्यात येणारी शेळी मेंढी गट वाटप योजना अत्यंत लोकप्रिय योजना आहे. कारण या योजनेअंतर्गत 50% ते 75% पर्यंत शासकीय अनुदान दिले जाते. या योजनेची संपूर्ण माहिती, लाभाचे स्वरूप, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज करण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे.


sheli mendhi vatap yojana

योजनेची वैशिष्ट्ये व उद्दिष्टे



योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप


या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दोन मुख्य पर्यायांमध्ये शेळी/मेंढी गटांचे वाटप केले जाते


  1. ५+१ शेळी/मेंढी गट + विमा (५ मादी + १ नर)
    • हा पर्याय प्रामुख्याने भूमिहीन, आणि अत्यंत लहान शेतकरी आणि महिलांसाठी उपयुक्त ठरतो.
    • यामध्ये ५ शेळ्या/मेंढ्या आणि १ बोकड/मेंढा दिला जातो.
    • सोबतच जनावरांचा विमा समाविष्ट असतो.
  2. १०+१ शेळी/मेंढी गट + विमा (१० मादी + १ नर)
    • ज्यांच्याकडे स्वतःची किंवा भाडेपट्ट्याची किमान जमीन उपलब्ध आहे, अशा शेतकऱ्यांसाठी हा पर्याय लागू होतो.
    • यामध्ये १० शेळ्या/मेंढ्या आणि १ बोकड/मेंढा दिला जातो.
    • सोबतच जनावरांचा विमा समाविष्ट असतो.

योजनेचे लाभार्थी


सर्व प्रवर्गातील भुमीहीन, अत्यल्प भुधारक, अल्प भुधारक, महिला बचत गट


लाभार्थी निकष


सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती मधील लाभार्थी खालील घटकांमधून उतरत्या प्राधान्य क्रमाने करण्यात येईल.


अ. भुमीहीन (फक्त ५+१ शेळी/मेंढी गटासाठी)

ब. अत्यल्प भूधारक (१ हेक्टरपर्यंत भूधारक)

क. अल्प भूधारक (१ ते २ हेक्टरपर्यंत भूधारक)

ड. वनहक्क धारक

इ. महिला बचत गटातील लाभार्थी (अ.क्र. अ ते ड मधील)


आरक्षणाचे प्रमाण



योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता व प्रमुख अटी



गटाची किंमत


1. 5+1 शेळी/मेंढी


अ. पशुधन खरेदी

  1. प्रति शेळी/मेंढी - रु.12,000/-
  2. बोकड/मेंढा - रु.15,000/-

ब. विमा 12.75%

क. विक्री कर 18%

ड. 5+1 शेळी/मेंढी गटाची एकूण किंमत - रु.86,284/-


2. 10+1 शेळी/मेंढी गटाची एकूण किंमत - रु. 1,55,311/-


प्रकल्प खर्च आणि अनुदानाचे स्वरूप


शासनाने निर्धारित केलेल्या दरपत्रकानुसार प्रकल्पाचा अंदाजित खर्च आणि त्यावर मिळणारे अनुदान खालीलप्रमाणे आहे.


घटक 5+1 गट (अंदाजित खर्च) 10+1 गट (अंदाजित खर्च)
एकूण प्रकल्प खर्च (विमा व करासह) सुमारे रु. 68,428/- सुमारे रु. 1,55,339/-
सर्वसाधारण प्रवर्ग अनुदान 50% (उर्वरित 50% स्वहिस्सा/बँक कर्ज) 50% (उर्वरित 50% स्वहिस्सा/बँक कर्ज)
अनु. जाती / अनु. जमाती (SC/ST) अनुदान 75% (उर्वरित 25% स्वहिस्सा/बँक कर्ज) 75% (उर्वरित 25% स्वहिस्सा/बँक कर्ज)

टीप: अनुदानाची रक्कम थेट बँक हस्तांतरणाद्वारे (DBT) लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात वर्ग केली जाते.


अनुदानाचे स्वरुप


सर्वसाधारण लाभार्थी 50 टक्के
अनुसुचित जाती जमाती प्रवर्गातील लाभार्थी 75 टक्के

आवश्यक कागदपत्रे



अटी व शर्ती



ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया



अर्ज करताना घ्यावयाची काळजी



शेळीपालन व्यवसाय सुरू करताना घ्यावयाची काळजी