E Pik Pahani Village List | ई पीक पाहणी यादी मध्ये आपले नाव पहा
ई-पीक पाहणी यादी म्हणजे एखाद्या गावातील किंवा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये कोणत्या प्रकारचे पिक घेतले आहे याची नोंद असलेली यादी. महाराष्ट्र शासनाने डिजिटल पद्धतीने शेतकऱ्यांच्या पिकांची माहिती संकलित करण्यासाठी आणि अधिक प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी ई-पीक पाहणी प्रणाली सुरू केली आहे. जेव्हा शेतकरी ऑनलाईन पद्धतीने स्वतःच्या पिकाची नोंद करतो त्यावेळी जाणून घेणे गरजेचे असते की त्याच्या पिकांची नोंद झाली आहे की नाही कारण बहुतांश वेळेला ऑनलाईन पद्धतीने पिकांची नोंद झालेली नसते परंतु शेतकऱ्यांना याची माहिती नसते त्यामुळे शासनामार्फत मिळणाऱ्या मदतीपासून शेतकरी वंचित राहतो. त्यामुळे ई पीक पाहणी यादी मध्ये आपले नाव कसे पहावे याची संपूर्ण माहिती आम्ही खाली दिलेली आहे.

- शेतकऱ्यांना प्रथम ई पीक पाहणी अँप ओपन करायचा आहे.
- अँप ओपन केल्यावर त्यामध्ये महसूल विभागाची निवड करायची आहे.
- आता समोर दोन पर्याय दिसतील त्यामध्ये शेतकरी म्हणून लॉगिन या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- आता तुम्हाला तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि खातेदाराची निवड करायची आहे.
- आता खाली सांकेतांक शब्द विसरला या पर्यायावरती क्लिक करायचे आहे आणि सांकेतांक शब्दा वरच्या चार बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे.
- आता तुमच्यासमोर डॅशबोर्ड ओपन होईल यामध्ये सगळ्यात खाली कोपऱ्यामध्ये गावाचे खातेदार पीक पाहणी या पर्याया वरती क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुमच्यासमोर संपूर्ण गावाची ही पीक पाहणी केलेली यादी ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव शोधायचे आहे.
आपली गावची e Peek pahani list पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ई पीक पाहणी शासन निर्णय 1 | Download | ई पीक पाहणी शासन निर्णय 2 | Download |
---|---|
ई पीक पाहणी शासन निर्णय 3 | Download |
ई पीक पाहणी शासन निर्णय 4 | Download |
E Pik Pahani Customer Care Number | 02025712712 |
E Pik Pahani App | Visit |
E Pik Pahani Website | Visit |
E Pik Pahani Registration Process PDF | Visit |