शेतकऱ्यांकडून पिकांचे स्वयं नोंदणी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना


भाग १ : नोंदणी प्रक्रिया

  1. नोंदणी प्रक्रियेसाठी स्मार्ट मोबाईल (Android) द्वारे गुगल प्ले स्टोर वरून ॲप डाऊनलोड करून स्थापित (Install) करावा.
  2. खातेदाराने ई पीक पाहणी अँप मध्ये मोबाईल क्रमांकाची नोंद करावी.
  3. 7/12 मधील नावाप्रमाणे खातेदाराने त्यांच्या नावाची अचूक पणे नोंदणी करावी.
  4. खातेदार त्यांचे नाव किंवा खाते क्रमांक शोधून नोंदणी करू शकतील.
  5. ज्या खातेदाराचे एकाच महसुली गावात एका पेक्षा अधिक खाते क्रमांक आहेत त्यांनी त्यांचे नाव नमूद केल्यास त्या गावातील त्यांचे सर्व खाते क्रमांक व त्याखालील सर्व भूमापन/गट क्रमांक मोबाईल स्क्रीन वर नोंदणीसाठी उपलब्ध दिसतील.
  6. वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएस ( SMS ) द्वारे चार अंकी संकेतांक (पासवर्ड) प्राप्त होईल.
  7. सदरहू प्राप्त झालेला चार अंकी संकेतांक (पासवर्ड) चौकटीत अचूकपणे नोंदविल्यास खातेदाराची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.
  8. यशस्वी नोंदणी प्रक्रियेनंतर नोंदणीकृत मोबाईलवर खातेदाराचे नाव निवडून चार अंकी संकेतांक (पासवर्ड) चौकटीत टाकून लोगिन केल्यास पिक पाहणीची माहिती भरता येईल.
  9. शेतकऱ्यांच्या नोंदणीकरिता त्यांचा खाते क्रमांक/भूमापन/गट क्रमांकाच्या माहितीसाठी संगणकीकृत 7/12 किंवा 8अ ची अद्ययावत प्रत सोबत ठेवावी.
  10. सामायिक मालकीच्या जमिनीसाठी ज्याचे नाव गाव नकाशा नं. 7/12 मध्ये सामायिक खातेदार म्हणून नोंदले आहे ते सर्व सामायिक खातेदार त्यांच्या वहीवाटीत असलेल्या क्षेत्रातील पिकांची स्वतंत्रपणे नोंदणी करू शकतील.
  11. अल्पवयीन खातेदाराच्या बाबतीत त्याचे पालक (अज्ञान पालक कर्ता) नोंदणी करू शकतील.
  12. खातेदाराने पीक पाहणी ची माहिती शेतामध्ये उभे राहून करायची असून पीक पाहणी भरून झाल्यावर त्या पिकाचा अक्षांश रेखांशासह फोटो (GPS enabled ) व सर्व माहिती अपलोड करायची आहे. जर मोबाईल इंटरनेट सुविधेत अडचण येत असल्यास गावातील ज्या परिसरात इंटरनेट कनेक्शन मिळेल त्या ठिकाणी जावून पीक पाहणीची माहिती अपलोड करता येईल.
  13. नोंदणीकृत मोबाईलवर आलेला चार अंकी संकेतांक (पासवर्ड) कायमस्वरूपी वैध राहून वापरता येईल.
  14. एखाद्या शेतकऱ्याकडे स्वतःचा स्मार्टफोन नसेल तर सहजरीत्या उपलब्ध होणारा दुसरा टॅबलेट नोंदणीसाठी वापरू शकतात.
  15. एका मोबाईल नंबरवरून एकूण 20 खातेदारांची नोंदणी करता येईल.

भाग २ : सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना

  1. शेतकऱ्यांच्या नोंदणीकरिता त्यांचा खाते क्रमांक / भूमापन / गट क्रमांकाच्या माहितीसाठी संगणकीकृत ७/१२ किंवा ८ अ ची अद्ययावत प्रत सोबत असल्यास योग्य राहील.
  2. सामायिक मालकीच्या जमिनीसाठी, ज्याचे नाव गाव न.नं. ७/१२ मध्ये सामायिक खातेदार म्हणून आहे, ते सर्व सामायिक खातेदार त्यांच्या वहीवाटीत असलेल्या क्षेत्रातील पिकांची स्वतंत्रपणे नोंदणी करू शकतील.
  3. अल्पवयीन खातेदाराच्या बाबतीत त्याचे पालक (अज्ञान पालक कर्ता) नोंदणी करू शकतील.
  4. खातेदाराने पीक पाहणी ची माहिती शेतामध्ये उभे राहून करायची असून पीक पाहणी भरून झाल्यावर त्या पिकाचा अक्षांश रेखांशासह फोटो (GPS enabled ) व सर्व माहिती अपलोड करायची आहे. जर मोबाईल इंटरनेट सुविधेत अडचण येत असल्यास गावातील ज्या परिसरात इंटरनेट कनेक्शन मिळेल त्या ठिकाणी जावून पीक पाहणीची माहिती अपलोड करता येईल.
  5. नोंदणीकृत मोबाईलवर आलेला चार अंकी संकेतांक (पासवर्ड) कायमस्वरूपी वैध राहून वापरता येईल.
  6. एखाद्या शेतकऱ्याकडे स्वतःचा स्मार्टफोन नसेल, तर सहजरीत्या उपलब्ध होणारा दुसरा स्मार्टफोननोंदणीसाठी वापरू शकतात.
  7. एका मोबाईल नंबरवरून एकूण २० खातेदारांची नोंदणी करता येईल.