ई पीक पाहणी नोंदणी शेवटची तारीख | E Pik Pahani Last Date
ई पीक पाहणी अंतर्गत पिकांची नोंदणी करण्याची शेवटची तारीख शासनाद्वारे वेळोवेळी निर्धारित केली जाते जी प्रत्येक वर्षी वेगवेगळी असू शकते.
महाराष्ट्र शासनाच्या ई-पीक पाहणी कार्यक्रमांतर्गत, रब्बी हंगाम 2024-2025 साठी शेतकरी स्तरावरील नोंदणीची अंतिम तारीख 15 जानेवारी 2025 होती.
यानंतर, सहाय्यक स्तरावरील नोंदणी 16 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2025 दरम्यान करण्यात आली.
रब्बी हंगामासाठी सहाय्यक स्तरावरील नोंदणी प्रक्रिया अद्याप सुरू आहे. खरीप हंगाम 2025 साठी नोंदणीच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत.
नोंदणीच्या अद्यतनांसाठी, कृपया महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा स्थानिक कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधा.
ई पीक पाहणी नोंदणी 2026 संदर्भात महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे.
रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांची नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांकडे आता फार कमी वेळ उरला आहे.
- स्वतः शेतकरी नोंदणी करण्याची शेवटची तारीख: रब्बी हंगामासाठी ई-पीक पाहणी करण्याची अंतिम मुदत 24 जानेवारी 2026 निश्चित करण्यात आलेली आहे. ( शेतकरी पिकांची नोंदणी ई-पीक पाहणी (DCS) या मोबाईल ॲप द्वारे करू शकतात.)
ई-पीक पाहणी संदर्भात महत्त्वाच्या तारखा आणि टप्पे
प्रत्येक हंगामासाठी नोंदणीचे 2 टप्पे असतात.
- शेतकरी स्तरावरील नोंदणी: 10 डिसेंबर 2025 ते 24 जानेवारी 2026
- तलाठी/सहायक स्तरावरील नोंदणी: शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणी नोंदणीची मुदत संपल्यानंतर पुढील 15 ते 30 दिवस ही सुविधा उपलब्ध असते.
ई-पीक पाहणी न केल्यास शेतकऱ्यांना होणारे नुकसान:
जर शेतकरी बांधवांनी शासनाद्वारे निश्चित करून दिलेल्या मुदतीत पीक पाहणी पूर्ण केली नाही तर खालील अडचणी येऊ शकतात.
- पीक विमा: शेतकऱ्यांना पीक विम्याचा परतावा मिळण्यात अडथळा येऊ शकतो.
- नुकसान भरपाई: नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळणे कठीण होते.
- पीक कर्ज: बँकेकडून पीक कर्ज घेताना ७/१२ उताऱ्यावर पिकाची नोंद असणे अनिवार्य असते.
महत्वाची सूचना: तुमच्या पिकाची नोंदणी करण्यासाठी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता आजच आपल्या पिकाची ई पीक नोंदणी पूर्ण करा. नोंदणी करताना काही तांत्रिक अडचण आल्यास तुम्ही तुमच्या गावातील तलाठी किंवा सीएससी केंद्राची मदत घेऊ शकता.