ई-पीक पाहणी प्रकल्पाचे राज्यभर अंमलबजावणीचे महत्वाचे टप्पे


  1. महसूल व कृषी यंत्रणा आणि शेतकऱ्यांसाठी जागरूकता आणि क्षमता निर्माण मोहीम चालवणे.
  2. खातेदारांची नोंदणी (फक्त एकाच वेळी) करणे.
  3. हंगाम निहाय पिकाची माहिती अक्षांश रेखांशासह काढलेल्या पिकाच्या फोटोसह अपलोड करणे.
  4. मोबाईल ॲप मधून प्राप्त झालेल्या पिकाची माहिती अचूकता पडताळून पिकाची माहिती तलाठी यांनी कायम करणे अथवा दुरुस्त करून कायम करणे.
  5. खातेनिहाय पिकांची माहिती संबंधित डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ मधील गाव नमुना नंबर १२ मध्ये उपलब्ध करून देणे.